Champat Rai Sarkarnama
देश

Ram Temple Trust : राम मंदिर देणगी प्रकरणी सर्वात मोठी घडामोड; महासचिव चंपत राय यांच्यासह एका विश्वस्तांचा तडकाफडकी राजीनामा

Champat Rai, Anil Mishra : शेकडो कोटींच्या घोटाळ्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी ट्रस्टने काही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे नाटक रचले आहे, असा आरोपही संजय सिंह यांनी केला आहे.

Rajanand More

Ayodhya Ram Mandir News : अयोध्येतील राम मंदिर देणगी प्रकरणी आता चांगलेच ऐरणीवर आले आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल करत आठ जणांना अटकही केली आहे. त्यानंतर काही तासांतच श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राम मंदिर देणगी प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला. कोट्यवधी रुपयांच्या देणगीची लूट झाल्याचे उघडकीस आले आहे. एसआयटीच्या अहवाला अनेक गंभीर खुलासे समोर आले आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चंपत राय आणि मिश्रा यांच्या राजीनाम्याला महत्व प्राप्त झाले आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ जणांपैकी रमाशंकर यादव उर्फ टिन्नू यादव हा आरोपी चंपत राय यांचा निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे राय यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याची चर्चा सुरू होती. एसआयटीकडून आता आरोपींची भूमिका आणि कथित नेटवर्कचा तपास केला जात आहे. यामध्ये आठ आरोपींसह अन्य काही जणांचा समावेश असू शकतो, असा संशय आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड दम दिला आहे. तर विरोधकांनी बड्या लोकांना वाचविले जात असल्याचा आरोप केला आहे. विरोधकांकडून चंपत राय यांच्यावरही गंभीर आरोप केले जात आहेत. एसआयटीच्या रिपोर्टमध्ये ट्रस्ट पदाधिकाऱ्यांचा उल्लेख आहे की नाही, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी उघडपणे चंपत राय, अनिल मिश्रा, भाजपचे माजी महापौर ऋषिकेश उपाध्याय आणि त्यांचे भाचे दीप नारायण यांचा उल्लेख केला आहे. जमीन घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे एसआयटीला दिल्याची माहिती सिंह यांनी दिली आहे. शेकडो कोटींच्या घोटाळ्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी ट्रस्टने काही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे नाटक रचले आहे, असा आरोपही संजय सिंह यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT