Jyoti Waghmare vs Sanjay Raut : रेडे, अश्लील शिवीगाळ..! खासदार ज्योती वाघमारेंनी राऊतांविरोधात उचललं मोठं पाऊल, आता फैसला दिल्लीत...

NCW Complaint, National Commission for Women : शिवसेना नेते आणि आमदारांचा सातत्याने 'रेडे' असा उल्लेख करत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय बदनाम केले जात आहे, अशी तक्रार ज्योती वाघमारे यांनी केली आहे.
Jyoti Waghmare, Sanjay Raut
Jyoti Waghmare, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena News : शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी गुरूवारी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर त्यांनी या वर्तनाबद्दल माफी मागितली. हा वाद पेटलेला असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे मैदानात उतरल्या आहेत.

ज्योती वाघमारे यांनी राऊतांविरोधात थेट राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेली अभद्र भाषा, अश्लील शिवीगाळ आणि महिला लोकप्रतिनिधींचा जाहीर अपमान याविरोधात त्यांनी आयोगाकडे दाद मागितली आहे. राऊत यांच्या गेल्या चार वर्षांतील वादग्रस्त विधानांची आणि वर्तनाची दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार वाघमारे यांनी केली आहे.

खासदार वाघमारे यांनी ई-मेलद्वारे आयोगाकडे ही तक्रार केली आहे. तक्रारीमध्ये वाघमारे यांनी संजय राऊत यांच्या काही विधानांचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि वैचारिक राजकारणाची मोठी परंपरा आहे, मात्र खासदार संजय राऊत यांच्या अत्यंत खालच्या पातळीवरील वक्तव्यांमुळे या परंपरेला मोठी ठेच पोहोचत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Jyoti Waghmare, Sanjay Raut
Giorgia Meloni : दिल्लीतून निवडणूक लढविली तर...! PM मेलोनी यांनी सांगितला भारत दौऱ्यातील 'तो' किस्सा

राऊत हे जाणीवपूर्वक अत्यंत अभद्र आणि अश्लील भाषेचा वापर करत आहेत. त्यांच्या या विधानांमुळे लोकप्रतिनिधी आणि महिलांचा अपमान झाला आहे. नुकत्याच शिवसेनेत दाखल झालेल्या खासदारांविषयी त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली. राजकीय द्वेषातून त्यांनी विकृतीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. शिवसेनेतील महिला लोकप्रतिनिधींचा उल्लेख वेश्या अशा अत्यंत अश्लील आणि अपमानजनक शब्दांत केला असल्याचे वाघमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Jyoti Waghmare, Sanjay Raut
Omraje Nimbalkar news : मशालीवर मत मिळेना म्हणणारे खासदार ओमराजे तोंडघशी; ZP, नगरपालिका, पंचायत समितीत ठाकरेंचे शिलेदार लढवतायेत किल्ला... हा घ्या पुरावा....

शिवसेना नेते आणि आमदारांचा सातत्याने 'रेडे' असा उल्लेख करत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय बदनाम केले जात आहे. राऊतांची ही भाषा आपल्या सहनशीलतेची परीक्षा पाहत आहे. महिला आणि महिला लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी राऊतांच्या मागील चार वर्षांच्या सर्व आपत्तीजनक विधानांची दखल घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com