Chandrababu Naidu News Sarkarnama
देश

Chandrababu Naidu Bail : ...अखेर 52 दिवसांनी चंद्राबाबू नायडूंना जामीन मंजूर

Andhra Pradesh Politics : कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना जामीन

Amol Jaybhaye

Chandrababu Naidu News : कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना मंगळवारी (३१ ऑक्टोबर) उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर येताच ते म्हणाले, ''मी हा स्नेह कधीच विसरणार नाही.

नायडू यांचे समर्थक त्यांची एक झलक पाहण्यासाठी तुरुंगाबाहेर जमले होते. नातू नारा देवांसही आजोबांना भेटायला आला होता. राजमुंद्री तुरुंगातून बाहेर येताच नायडूंनी आपल्या नातवाची गळाभेट घेतली.

चंद्राबाबू नायडूंना चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोमवारी (३० ऑक्टोबर) न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी (३१ ऑक्टोबर) आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) उच्च न्यायालयाने नायडू यांना २८ नोव्हेंबरपर्यंत चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला.

हायकोर्टाने नायडू यांना 28 नोव्हेंबरला आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. हायकोर्टाने (High Court) नायडूंना रुग्णालयात उपचार घेण्याशिवाय इतर कोणत्याही कामात सहभागी न होण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती मिळत आहे.

फोनवर बोलू नये तसेच कोणत्याही राजकीय कार्यात सहभागी होऊ नये किंवा प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. नायडू यांना ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. ते 53 दिवस तुरुंगात होते. त्याच्या मुख्य जामीन याचिकेवर १० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT