Rajasthan Election : राजस्थान निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Rajasthan Politics : राजस्थानमधील 200 जागांपैकी 151 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Assembly Elections : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या चौथ्या यादीत ५६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. चौथ्या यादीत समाविष्ट असलेल्या मोठ्या नावांमध्ये- मानवेंद्र सिंह यांना सिवाना, गौरव वल्लभ उदयपूरमधून, प्रशांत बैरवा निवाईतून यांना मकराना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यापूर्वी काँग्रेसने (Congress) उमेदवारांच्या तीन यादीत 95 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. आता चौथ्या यादीत समाविष्ट असलेल्या 56 उमेदवारांसह, पक्षाने राजस्थानमधील 200 जागांपैकी 151 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

Congress News
Sharad Pawar and Dilip Walse Patil: शरद पवार अन् दिलीप वळसे पाटील एकाच मंचावर येणं टळलं...

काँग्रेसच्या चौथ्या यादीत राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ, माजी खासदार बद्री राम जाखड, नुकतेच भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले विकास चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे. गौरव वल्लभ यांना उदयपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी खासदार बद्री राम जाखड यांना बाली मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे.

भाजपने आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपच्या (BJP) दोन यादीत 124 नावे होती. आता चौथी यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने एकूण 151 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थानमध्ये (Rajasthan) 25 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Congress News
Ajit Pawar Health Update News : अजितदादांचा ताप 100 क्रॉस, प्लेटलेट्सही 80 हजार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com