Chandrababu Naidu Government News : आंध्र प्रदेशमध्ये आता एक अनोखा नियम लागू होत आहे. खरंतर आतापर्यंत लोकसंख्या नियंत्रित आणण्यासाठी कमी मुलं जन्माला घालण्यासाठी धोरणं अवलंबवली जात होती. परंतु आंध्रप्रदेशमध्ये चक्क जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी सरकारकडून जोर दिला जात असल्याचं समोर आलं आहे.
विशेष म्हणजे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू(Chandrababu Naidu) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, कोणताही व्यक्ती सरपंच, नगरपालिकेचा नगरसेकव किंवा महापौर तेव्हाच बनू शकतो, जेव्हा त्याला दोन पेक्षा अधिक मुलं असतील. त्यांनी संकेत दिला की, यामुळे लोकसंख्येतील घसरण रोखली जाईल.
नायडू म्हणाले की, ते लोकांना जास्त मुलं जन्माला घालण्यास प्रोत्साहित करण्यासंबंधी धोरणं आणतील. त्यांनी अशातच नरविरपल्ले येथे मीडियाशी बोलताना म्हटले, एक काळ होता जेव्हा जास्त मुलं असणाऱ्या व्यक्तिला पंचायत किंवा स्थानिक नगरपालिका निवडणूक लढण्याची परवानगी नव्हती. आता मी हे म्हणतोय की कमी मुलं असणारे व्यक्ति निवडणूक लढवू शकणार नाहीत. तुम्ही सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष किंवा महापौर तेव्हाच बनू शकाल जेव्हा तुमची दोन पेक्षा अधिक मुलं असतील. मुख्यमंत्री नायडूंच्या मते उत्तर भारत जवळपास १५ वर्षांत स्थिर प्रजनन दराच लाभ गमावू शकतो.
तेलगु देसम पार्टीच्या(TDP) प्रमुखांनी म्हटले की, जुन्या पिढीतील लोक अधिक मुलं जन्माला घालत. तर वर्तमान पिढी यामध्ये घट करून एका मुलावर आली आहे. त्यांनी हे देखील अधोरेखित केले की, आजकाल काही 'स्मार्ट' लोक डबल इनकम नो किड्स(DINK) संकल्पना स्वीकारत आहेत. तसेच, त्यांनी म्हटले की, आपल्या आई-वडिलांनी चार ते पाच मुलं जन्माला घातली आणि तुम्ही ती संख्या घटवून एकवर आणली. आता तर अतिहुशार लोक असंही म्हणत आहेत की, दुप्पट कमाई अन् कोणतही मुल नाही. आम्हाला मजा-मस्ती करू द्या. जर त्यांच्या आई-वडिलांनी असा विचार केला असता, तर तेया जगात आलेच नसते.
नायडू म्हणाले की, सर्वच देशांनी ही चूककेली आहे आणि आपल्याला योग्य वेळेवर निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी म्हटले की, आधी जास्त मुलं जन्माला घालण्याच्या महत्त्वावर जोर दिला गेला नाही आणि परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे. दक्षिण कोरिया जपान तसेच युरोपियन देशांचा दाखला देत त्यांनी म्हटले की, त्या ठिकाणी लोकांना लोकसंख्येतील घसरणीच्या धोक्याची जाणीव नाही, तर त्यांचे संपूर्ण लक्ष केवळ पैसा कमावण्यावर, उत्पन्न वाढण्यावर तसेच देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यावर केंद्रित आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.