
Arvind Kejriwal in Delhi Vidhan sabha Election : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे, याबाबतची माहिती आता समोर आली आहे. कारण, बुधवारी अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीसाठी शपथपत्र दाखल केले आणि त्यातील माहितीनुसार केजरीवालांकडे एकूण १.७३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. केजरीवालांनी बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी नवी दिल्ली मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आलेल्या शपथपत्रानुसार अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांच्या संपत्तीमध्ये बँकेतील बचतीच्या रुपात २.९६ लाख रुपये आणि नगदी स्वरुपात ५० हजार रुपये आहेत. त्यांची स्थावर मालमत्ता १.७ कोटी रुपये आहे. शपथपत्रात हे देखील समजले आहे की, केजरीवालांकडे कोणतेही घर किंवा कार नाही. शपथपत्रानुसार आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये केजरीवालांचे उत्पन्न ७.२१ लाख रुपये होते.
केजरीवालांपेक्षा श्रीमंत त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल या आहेत. त्यांची एकूण संपत्ती २.५ कोटी रुपये आहे, ज्यामध्ये एक कोटी रुपयांपेक्षा अधिक जंगम मालमत्ता आहे. ज्यामध्ये २५ लाख रुपये किंमतीचे ३२० ग्रॅम सोने आणि ९२ हजार रुपये किंमतीची एक किलो चांदी आहे. याशिवाय १.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
तसेच, शपथपत्रात म्हटले गेले आहे की, केजरीवाल यांच्या पत्नीच्या नावावर गुरुग्राममध्ये एक घर आहे आणि एक लहान पाच सीटर कार आहे. केजरीवाल दाम्पत्याकडे एकूण ४.२५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्ली मतदार संघातून विधानसभा निवडणूक(Vidhansabha Election) लढवत असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी २०२०मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रात ३.४ कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली होती. २०१५मध्ये जी २.१ कोटी रुपये होती.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला भरण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने ईडीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ऐन दिल्ली निवडणुकीपूर्वी केजरीवालांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.