Kamalnath , shivrajsinh Chouhan  Sarakranama
देश

Madhya Pradesh Exit Polls : मध्य प्रदेशमध्ये होणार सत्तांतर ? भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत

Change of power in Madhya Pradesh?; Tough fight between BJP, Congress: मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा येण्याची शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार निर्माण झाली आहे.

Sachin Waghmare

Madhya Pradesh Exit Polls Result 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडला आहे. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजपने प्रचारासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. त्या पोलनुसार मध्य प्रदेशच्या २३० जागांच्या विधानसभेत काँग्रेसला १११ ते १२१ जागा मिळतील व भाजपला १०६ ते ११६ जागा मिळतील असा अंदाज आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस व भाजपमध्ये चुरशीची लढत पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा मध्य प्रदेशमध्ये येण्याची शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार निर्माण झाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही सेमिफायनल म्हणून याकडे बघितलं जात आहे. यामुळे भाजप व काँग्रेस पक्षांसाठी या विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये एक्झिट पोलचे निकाल आले असून, येथे काँग्रेस सत्तेत येणार असे दिसत आहे. परंतु पोलनुसार काँग्रेस व भाजपमधील अंतर खूपच कमी आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपमध्ये चुरस होण्याची शक्यता आहे. ४५ टक्क्यांहून अधिक मते काँग्रेसच्या खात्यात जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोल सर्व्हेनुसार मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचे दिसत आहे. कमलनाथ (kamalnath) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा बहुमताने पुनरागमन करताना दिसत आहे. काँग्रेसने येथील २३० जागांपैकी १११ ते १२१ जागा मिळण्याचा दावा केला जातोय, तर भाजपला १०६ ते ११६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होण्याचा अंदाज आहे. निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या तुलनेत काँग्रेस चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. ओपिनियन पोलनुसार भाजपला १०२ ते ११० जागा तर काँग्रेसला ११८ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

रिपब्लिक भारतच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला ९७ ते १०७ जागा आणि ४१.७ टक्के मते मिळतील तर भाजपला ११८ ते १३० जागा आणि ४३.४ टक्के मते, असा अंदाज वर्तविला आहे. तर जन की बात एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेसला १०२ ते १२५ जागा मिळू शकतात तर भाजपला १०० ते १२३ आणि शकतात, असा अंदाज वर्तवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

२०१८ च्या निवडणुकीत काय झाले होते ?

मध्य प्रदेशात २०१८ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १०९ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने ११४ जागांवर विजय मिळवला होता. पण काँग्रेसमध्ये फूट पडली आणि ज्योतिरादित्य शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये गेले आणि काँग्रेसचे पक्षाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार कोसळले होते. त्यानंतर भाजपचे शिवराजसिंह चौहान (Shivarajsinh chouhan) पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT