Mizoram Exit Polls : ना काँग्रेस, ना भाजप, मिझोराममध्ये या दोन पक्षांपैकी येणार एकाची सत्ता?; काय सांगतो एक्झिट पोल

Mizoram Exit Polls 2023 : भारताच्या ईशान्येतील प्रमुख राज्य असलेल्या मिझोराममध्ये कुणाची सत्ता येणार? पाहा काय आहे एक्झिट पोल...
Mizoram Exit Polls 2023
Mizoram Exit Polls 2023Sarkarnama
Published on
Updated on

Mizoram Exit Poll Results 2023 Live Updates : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे येत्या 3 डिसेंबरला लागणार आहेत; पण या निकालापूर्वी या राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. मिझोराममध्ये विधानसभेच्या 40 जागा आहेत आणि सत्ता स्थापनेसाठी 21 जागांची गरज आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट (MNF) आणि जोराम पिपल्स मुव्हमेंट (ZPM) यांच्यात काट्याची टक्कर दिसून येत आहेत.

Mizoram Exit Polls 2023
Chhattisgarh Exit Polls: छत्तीसगडमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत; भाजपचं सत्तेचं स्वप्नं भंगणार !

मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान झाले. या निवडणुकीत 8.57 लाख नागरिकांनी मतदान केले. सरासरी 77 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत 18 महिला उमेदवार होत्या, तर एकूण 174 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. एमएनएफ आणि प्रमुख विरोधी पक्ष झेडपीएमसह काँग्रेस सर्व 40 जागांवर निवडणूक लढवली. तर भाजपने 23 आणि आम आदमी पक्षाने 4 जागांवर आपले उमेदवार उतरले होते. ( Assembly Elections 2023 )

आता मिझोराम निवडणुकीवर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यात सत्ताधीर एमएनफ आणि प्रमुख विरोधी पक्ष झेडपीएम यांच्या काट्याची टक्कर दिसून येत आहे. 'रिपब्लिक टीव्ही-जन की बात' यांच्या एक्झिट पोलमध्ये झेडपीएमला 15 ते 25 तर एमएनएफला 10 ते 14 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 5 ते 9 आणि भाजपला 2 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ( Rajasthan Election 2023 )

पोल स्टार्टच्या एक्झिट पोलमध्ये झेडपीएमला अधिक जागा दाखवण्यात आल्या आहेत. झेडपीएमला 15 ते 25, एमएनएफला 10 ते 14, भाजपला 2 तर काँग्रेसला 5 ते 9 जागा मिळतील असा अंदाज मांडला आहे.

Mizoram Exit Polls 2023
Exit Poll Vs Opinion Poll : 'एक्झिट पोल' आणि 'ओपिनियन पोल'मध्ये नेमका फरक काय?

> सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार एमएनएफ 15 ते 21, झेडपीएम 12 ते 18, काँग्रेस 2 ते 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर भाजपला खातंही उघडता येणार नाही, असे या अंदाजात म्हटले आहे.

> सीएनएक्सच्या एक्झिट पोलमध्ये एमएनएफ 14 ते 18, झेडपीएम 12 ते 16, काँग्रेस 8 ते 10 आणि भाजपला 2 जागा मिळतील, असे म्हटले आहे.

> मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार एमएनएफ 17 ते 22, झेडपीएम 7 ते 12, काँग्रेस 7 ते 10 मिळतील. अपक्षांना 1 ते 2 जागा जिंकतील. पण भाजपला एकही जागा मिळणार नाही, असे मॅट्रिझने म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com