cm vishnu deo sai, deputy cm Arun Sao And Vijay Sharma Sarkarnama
देश

Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये भाजप सरकारचा 'महाराष्ट्र' पॅटर्न..!

Two Deputy CM : अरुण साओ आणि विजय शर्मा हे दोन नवे उपमुख्यमंत्री, तर रमण सिंह विधानसभा अध्यक्ष

सरकारनामा ब्यूरो

Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये भाजप सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर 'महाराष्ट्र' पॅटर्न राबविल्याचे चित्र दिसून आले. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच रमण सिंह यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसोबतच उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे.

राज्यात महाराष्ट्रा प्रमाणेच दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. भाजप BJP चे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ आणि विजय शर्मा यांना उपमुख्यमंत्री तर माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना विधानसभेचे अध्यक्ष केले जाणार आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी विष्णू देव साई Vishnu Deo Sai या आदिवासी नेत्याची निवड केली आहे, तर दोन उपमुख्यमंत्री निवडताना ओबीसी व्होटबँकचा विचार केला आहे.

अरुण साओ हे ओबीसी समाजातील नेते आहेत. तर विजय शर्मा हे कबीरधाम जिल्ह्यातील करवधा येथून भाजपचे आमदार आहेत. त्यांनी मंत्री मोहम्मद अकबर यांचा 39,592 मतांनी पराभव केला आहे. विजय शर्मा हे छत्तीसगड Chhattisgarh भाजपचे प्रदेश सरचिटणीस असून भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. विजय शर्मा हे ५० व्या वर्षी पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.

तर अरुण साओ यांनी मुंगेली जिल्ह्यातील लोर्मी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार थानेश्वर साहू यांचा ४५८९१ मतांनी पराभव केला आहे. सध्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. गेल्या वर्षीच ऑगस्ट महिन्यात त्यांना विष्णुदेव साईंच्या जागी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ते बिलासपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले आहेत.

आमदार निवडून आल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने त्यांना खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगितले होते. विजय शर्मा यांच्याप्रमाणेच ५५ वर्षीय अरुण साओ हेही पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून निवडून आलेले रमण सिंह हे छत्तीसगडच्या भाजप सरकारमध्ये तीनदा मुख्यमंत्री राहिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळीही ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सहभागी झाले होते. मात्र त्यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा अनुभव वापरण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. रमणसिंग यांनी त्यांच्या पारंपरिक राजनांदगावमधून निवडणूक जिंकली आहे.

( Edited by Amol Sutar )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT