Vishnu Dev Sai : छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी विष्णू देव साय यांची भाजपकडून निवड!

Chhattisgarh New CM : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाला राज्याचे नेतृत्व देत, भाजपाने साधली संधी!
Vishnu Dev Sai
Vishnu Dev SaiSarakarnama
Published on
Updated on

Chhattisgarh Chief Minister News : भाजपाने छत्तीसगडचा भावी मुख्यमंत्री अखेर निश्चित केला आहे. रविवारी झालेल्या विधिमंडळाच्या बैठकीत विष्णू देव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भाजपाने या निवडीतून आगामी लोकसभा निवडणुकीत आदिवासांची जास्तीत जास्त मतं मिळवण्याच्या दृष्टीने पायाभरणी केल्याचे दिसत आहे. कारण, विष्णू देव साय हे आदिवासी समाजातून येतात, त्यामुळे भाजपला निश्चितच फायदा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vishnu Dev Sai
Narendra Modi News : नरेंद्र मोदी मुख्यमंत्री बदलणार; तीन राज्यात नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

विष्णु देव साय हे 1980मध्ये भाजपमध्ये सहभागी झाले होते. छत्तीसगडमधील कुनकुरी विधानसभा मतदारसंघाचे ते नेतृत्व करतात. छत्तीसगडमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे अगोदरपासूनच असा अंदाज वर्तवला जात होता की, भाजप मुख्यमंत्रिपदासाठी एखाद्या आदिवासी नेत्याच्याच चेहऱ्याची निवड करेल.

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी आज भाजपचे केंद्रीय पर्यवेक्षक सर्बानंद सोनोवाल, आणि अर्जुन मुंडा हे दिल्ली येथून रायपुरला पोहचले होते. विमानतळावर पोहचल्यावर दोन्ही नेत्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Vishnu Dev Sai
Mayawati: मोठी बातमी ! मायावतींचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत आकाश आनंद ?

विष्णू देव साय हे 2020 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, तसेच ते खासदार आणि केंद्रीय मंत्री सुद्धा होते. याशिवाय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे निकटवर्तीय सुद्धा आहेत. 21 फेब्रुवारी 1964 रोजी जशपूर येथे विष्णू देव साय यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता.

पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात ते केंद्रीय राज्यमंत्री होते. सोळाव्या लोकसभेत ते छत्तीसगडमधील रायगड येथून निवडणूक जिंकत खासदार झाले होते.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com