Chief Justice of India Bhushan Gavai Sarkarnama
देश

CJI Bhushan Gavai News : फक्त माझ्या कानापुरतेच राहू द्या..! वादानंतर सरन्यायाधीश गवईंनी न्यायाधीशांसोबतचा संवाद केला सार्वजनिक

Chief Justice BR Gavai’s Remark on Social Media Misrepresentation : सरन्यायाधीश गवई यांची ही टिप्पणी महत्वाची मानली जात आहे. कोर्टात करण्यात आलेल्या टिप्पणीवरून यापूर्वी अनेकदा सोशल मीडियात उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आहेत.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. सोशल मीडियातील वाद आणि हल्ला: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खजुराहो मंदिरातील भगवान विष्णू मूर्ती प्रकरणातील टिप्पणीवरून सोशल मीडियात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर एका वकिलाने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.

  2. सीजेआयंची प्रतिक्रिया: गवई यांनी सुनावणीदरम्यान हलक्या फुलक्या शैलीत सांगितले की, आता सोशल मीडियात काय मांडले जाईल हे सांगणे कठीण झाले आहे, कारण त्यांच्या वक्तव्यांचे चुकीचे अर्थ लावले जातात.

  3. चुकीच्या अर्थाची चिंता: याआधीही गवई यांनी त्यांच्या खजुराहो मंदिरातील टिप्पणीचा विपर्यास झाल्याबाबत चिंता व्यक्त केली होती, आणि न्यायालयीन संवादाचे स्वरूप सोशल मीडियामुळे कसे बदलले आहे, याकडे लक्ष वेधले.

Supreme Court’s Stand on Social Media Accountability : सुप्रीम कोर्टाचे निकाल, निरीक्षण किंवा टिप्पणीबाबत सोशल मीडियात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असतात. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खजुराहो येथील पुरातन मंदिरातील भगवान विष्णू मुर्तीच्या पुनर्स्थापनेबाबतच्या याचिकेवरील टिप्पणीवरूनही असाच वाद निर्माण झाला होता. त्यावरूनच सोमवारी कोर्टात सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न एका वकिलाने केला. या घडामोडींनंतर सरन्यायाधीश गवई यांनी मंगळवारी सूचक विधान केले.

ऑल इंडिया जजेस असोसिएशनच्या याचिकेवरील सुनावणदरम्यान सीजेआय गवई यांनी सोशल मीडियातील वादाबाबत टिप्पणी केली. सोशल मीडियाच्या युगात न्यायव्यवस्था आणि संवादाच्या बदलत्या स्वरुपाबाबत त्यांनी ही टिप्पणी केल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सरन्यायाधीश गवई यांच्यासोबत यावेळी न्यायाधीश के. विनोद चंद्रन हे होते. सुनावणीदरम्यान हलक्याफुलक्या शैलीत बोलताना गवई म्हणाले की, ‘आता सोशल मीडियात काय मांडले जाईल, हा अंदाज बांधणे कठीण आहे.’ यावेळी त्यांनी एका केसच्या सुनावणीदरम्याचा किस्सा सांगितला.

सीजेआय म्हणाले, माझे बंधू न्यायाधीश विनोद चंद्रन यांना काहीतरी बोलायचे होते. मी त्यांना थांबवले. त्यावेळी आम्ही धीरज मोर प्रकरणावर सुनावणी करत होतो. नाहीतर सोशल मीडियात काय आले असते माहिती नाही. मी त्यांना म्हणालो होतो की, हे फक्त माझ्या कानापर्यंतच राहूद्या.

सरन्यायाधीश गवई यांची ही टिप्पणी महत्वाची मानली जात आहे. कोर्टात करण्यात आलेल्या टिप्पणीवरून यापूर्वी अनेकदा सोशल मीडियात उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आहेत. यापूर्वीही सरन्यायाधीशांनी आपल्या खजुराहोतील भगवान विष्णुच्या मुर्ती प्रकरणात केलेली टिप्पणी चुकीच्या पध्दतीने मांडल्याबाबत चिंता व्यक्त केली होती.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: सरन्यायाधीश भूषण गवई कोण आहेत?
A: ते भारताचे विद्यमान सरन्यायाधीश (CJI) आहेत.

Q2: सोशल मीडियावर वाद का झाला?
A: त्यांच्या खजुराहो मंदिरातील मूर्ती पुनर्स्थापना प्रकरणातील टिप्पणीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला.

Q3: कोर्टात काय घडले?
A: एका वकिलाने गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे सुरक्षा वाढवण्यात आली.

Q4: गवई यांनी काय प्रतिक्रिया दिली?
A: त्यांनी सांगितले की, सोशल मीडियात न्यायालयीन वक्तव्यांचे अर्थ अनेकदा चुकीच्या पद्धतीने मांडले जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT