
CJI BR Gavai Targeted During Supreme Court Proceedings : सुप्रीम कोर्टात सोमवारी कामकाजादरम्यान एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर कोर्टात प्रचंड खळबळ उडाली. राकेश राकेश किशोर असे या वकिलाचे नाव असून घटनेनंतर त्याच्यावर बार कौन्सिलने कारवाईचा बडगा उगारला आहे. घटनेनंतर या वकिलाने प्रतिक्रिया देताना धक्कादायक विधान केले आहे.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना राकेश किशोर या वकिलाने आपल्या कृतीचे समर्थन केले. सरन्यायाधीश गवई यांच्या एका निकालामुळे खूप दु:ख झाल्याचे सांगत वकील म्हणाला, गवईसाहेबांनी सनातन धर्माची खिल्ली उडवली. ही घटना त्याच कृतीवरील प्रतिक्रिया होती. ता. 16 सप्टेंबरला सरन्यायाधीशांच्या कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
गवईसाहेबांनी त्या याचिकेची खिल्ली उडवल्याचे राकेश किशोर याने म्हटले. खजुराहो येथील पुरातन मंदिरातील भगवान विष्णुच्या मुर्तीच्या पुनर्स्थापनेबाबत ही याचिका होती. या याचिकेवरील गवई यांच्या विधानावर वाद झाला होता. त्याचाच संदर्भ या वकिलानेही दिला. कोर्टाकडून इतर समाजाशी संबंधित प्रकरणांमध्ये वेगळी भूमिका घेतली जाते, असा आरोपही वकिलाने केला.
हल्द्वानी येथील रेल्वेच्या जागेवर एका विशिष्ट समजाने केलेला कब्जा हटविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन वर्षापूर्वी दिलेली स्थगिती अजूनही आहे. त्याचप्रमाणे नूपुर शर्मा प्रकरणात कोर्टाने परस्थिती खराब होऊ शकते, असे म्हटले होते. पण सनातन धर्माशी संबंधित प्रकरणांमध्ये कोर्ट काही ना काही असा आदेश देते, ज्यामुळे आपल्याला दु:ख होते, असे वकिलाने म्हटले आहे.
याचिकाकर्त्याला दिलासा द्यायचा नसेल तर देऊ नका, पण त्यांची खिल्ली उडवायला नको होती, असेही वकील राकेश किशोर यांनी म्हटले आहे. मी हिंसेच्या विरोधात आहे. पण तुम्ही हेही पाहा, की एक अहिंसक व्यक्ती, एक साधा सरळ व्यक्ती, जो कोणत्याही गटाचा नाही, त्याच्यावर कुणीही नाही, त्या असे का करावे लागले? ही विचार करण्याजोगी बाब आहे.
मीही कमी शिकलेलो नाही. मी गोल्ड मेडलिस्ट आहे. मी नशेत होतो किंवा कोणत्या गोळ्या खाल्या होत्या, असे काहीही नाही. त्यांनी कृती केली, त्यावर माझी प्रतिक्रिया होती. तुम्हा हे जसे घ्यायचेय तसे घ्या. मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही आणि मला त्याबाबत खंतही नाही, असे वकिलाने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी कालच वकिलाची चौकशी करून तक्रार न आल्याने सोडून दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.