Tamil Nadu lockdown News
Tamil Nadu lockdown News Sarkarnama
देश

मोठी बातमी; राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा, 'या' तारखेला असणार कडक निर्बंध

सरकारनामा ब्युरो

चेन्नई : तमिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Chief Minister MK Stalin) यांनी येत्या २३ जानेवारीला राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तमिळनाडूमध्ये आज २८ हजार ५६१ कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे तर चेन्नईमध्ये ७ हजार ५२० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे आता पर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ही राज्यात ३० लाखांच्या पार गेली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची हिच संख्या लक्षात घेता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Tamil Nadu lockdown News)

तमिळनाडूमध्ये यापुर्वी ६ जानेवारीपासून सरकारने विकेंड लॉकडाऊनसह रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे राज्यात सध्या दर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन आहे. तर प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात येत आहेत. याचबरोबर रेस्टॉरन्ट, मॉल आणि दुकानेही हे तीन दिवस बंद राहतात. दर रविवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि मेट्रो सेवा बंद राहते.(Tamil Nadu Complete lockdown News)

याशिवाय सरकारने विवाहासाठी १०० व्यक्ती आणि अंत्यविधीसाठी ५० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा घातली आहे. सर्व सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मासळी आणि भाजी बाजार हे गर्दी टाळण्यासाठी दुसरीकडे हलवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालये वगळता सर्व महविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था बंद करण्यात आल्या आहेत.

मात्र आता आजच्या निर्णयानंतर २३ तारखेला सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद राहणार आहेत. याशिवाय लग्नातील १०० लोकांच्या उपस्थितीवर देखील मर्यादा राहणार आहेत. सार्वजनिक वाहतूकही बंद राहण्याची शक्यता आहे. या घोषणेमुळे संपूर्ण लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करणारे तमिळनाडू (Tamilnadu) हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT