जयंत पाटील म्हणाले, `तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे`

अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका केलेल्या सिनेमाचा वाद
NCP leader Jayant Patil & Dr Amol Kolhe
NCP leader Jayant Patil & Dr Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : खासदार डॅा अमोल कोल्हे (DR. Amol Kolhe) यांनी २०१७ मध्ये 'त्या' सिनेमामध्ये भूमिका केली आहे त्यामुळे नोटीस काढायची व या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

NCP leader Jayant Patil & Dr Amol Kolhe
माझा नव्हे, सुरगाण्यात आमदार नितीन पवारांचा करेक्ट कार्यक्रम झाला!

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका केल्यानंतर जो वाद निर्माण झाला आहे त्यावर जयंत पाटील यांनी पक्षाची रोखठोक भूमिका माध्यमांशी बोलताना मांडली.

NCP leader Jayant Patil & Dr Amol Kolhe
निकालानंतर भाजप उमेदवाराच्या झटापटीत मोहिनी जाधव यांचा मृत्यू!

ते म्हणाले, नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाचा कोणताही सिनेमा निघत असेल तर त्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे असेही जयंत पाटील म्हणाले. हा सिनेमा मी पाहिला नाही किंवा त्यांची भूमिकाही. राष्ट्रवादीत येण्याअगोदरची भूमिका अमोल कोल्हे यांनी केली आहे. मात्र त्याचे प्रदर्शन इतक्या उशिरा का होतेय हे माहित नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

या भूमिकेवर लोकांच्या प्रतिक्रिया व भावना व्यक्त होत आहेत त्या चुकीच्या नाहीत. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी २०१७ साली ती भूमिका केली आहे. राष्ट्रवादीत ते त्यानंतर आले आणि लोकसभेची निवडणूक जिंकले. छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करुन ते घराघरात पोचले. शिवाय लोकसभेत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भाषणेही केली आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

तो सिनेमा बघण्याची व वेळ घालवण्याची आवश्यकता नाही आमची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com