Chief Minister Sarkarnama
देश

Chief Ministers in India : परिस्थितीमुळे मुख्यमंत्री बनले अन् बड्या नेत्यांच्या आदेशानं पद गेलं!

Rajanand More

New Delhi : मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये नेहमीच स्पर्धा असते. पण अनेकदा राजकीय परिस्थितीमुळे अनपेक्षितपणे हे पद मिळतं. एवढंच नाही तर अशाच परिस्थितीमुळे हे पद सोडावं लागल्याची अनेक उदाहरणंही महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात आहेत.

झारखंडमध्ये नुकतंच हे घडलं. कथित भूखंड घोटाळाप्रकरणी अटक झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चंपई सोरेन या पदावर आले. पण हेमंत सोरेन जेलमधून बाहेर येताच त्यांना राजीनामा द्यावा लागला. हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेतली. चंपई सोरेन यांना नेत्याच्या आदेशानंतर पदाचा त्याग करावा लागला.

जयललितांसाठी त्याग

एआयएडीएमकेचे नेते ओ पनीरसेल्वम हे तीनवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. दोनवेळा त्यांना दिवंगत जयललिता यांनीची या खुर्चीवर बसवलं होते. त्यानंतर परिस्थिती ठीक झाली अन् पुन्हा जयललिता यांनी पदाची शपथ घेतली. 2001 आणि 2014 मध्ये पनीरसेल्वम यांना जयललिता यांनीच पद दिलं आणि काही महिन्यांत काढूनही घेतलं.

लालूंची राजकीय रणनीती

चारा घोटाळ्यामध्ये तुरुंगात जावे लागल्याने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री बनवलं होतं. 24 जुलै 1997 रोजी हायकोर्टाने लालूंना जामीन नाकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राबडीदेवी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या. त्या जवळपास 1 वर्ष 201 दिवस मुख्यमंत्री होत्या.

नितीश कुमारांचा मांझींवर भरवसा

बिहारचे मुख्यमत्री नितीश कुमार यांनी एकदा जीतन राम मांझी यांच्यावर विश्वास दाखवला होता. मे 2014 ते फेब्रुवारी 2015 या कालावधीत ते मुख्यमंत्री होते. नितीश यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण फेब्रुवारी 2015 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर मांझी यांनी पक्ष सोडला.

भाजपवरही आली होती वेळ

दिल्लीत आतापर्यंत एकदाच भाजपला सत्ता मिळाली आहे. मदनलाल खुराना यांनी 2 डिसेंबर 1993 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण काही महिन्यांतच एका हवाला प्रकरणात त्यांचं नाव आल्याने राजीनामा द्यावा लागला. त्यांच्याजागी साहिब सिंह वर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यानंतर निवडणुकीच्या काही दिवस आधी सुषमा स्वराज मुख्यमंत्री बनल्या. त्या जवळपास दीड महिना मुख्यमंत्री होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT