Donald trump, Xi Jinping Sarkarnama
देश

China threat to US : चीनमुळे अमेरिकेवर कोरोनापेक्षा मोठे संकट! तज्ज्ञाने दिला महाभयंकर धोक्याचा इशारा

Gordon Chang's Assessment of China's Threat to the US : पिकांमध्ये गंभीर रोगांचा प्रादुर्भाव करणाऱ्या व मानवी आरोग्यालाही बाधा पोहचविणाऱ्या विषारी बुरशीची चीनहून अमेरिकेत तस्करी झाल्याचे नुकतेच समोर आले आहे.

Rajanand More

National Security and Economic Risks for America : चीनबाबत अमेरिकेतील एका तज्ज्ञाने धोक्याचा इशारा दिला आहे. चीनसोबत सर्व संबंध तोडले नाही तर कोरोनापेक्षा महाभयंकर स्थिती निर्माण होईल, असा दावा संबंधित तज्ज्ञांनी केला आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाचे अभ्यासक व विश्लेषक गॉर्डन जी चांग यांनी अमेरिकेला सावध केले आहे.

काय आहे प्रकरण?

पिकांमध्ये गंभीर रोगांचा प्रादुर्भाव करणाऱ्या व मानवी आरोग्यालाही बाधा पोहचविणाऱ्या विषारी बुरशीची चीनहून अमेरिकेत तस्करी झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. याप्रकरणी जियान युनक्विंग आणि तिचा मित्र झुयोंग लियू या दोन चिनी संशोधक विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (एफबीआय) अटक केली आहे.

कृषी दहशतवाद

बुरशी विषारी असल्याने त्यामुळे मानव जनावरांना गंभीर समस्या उद्भवू शकतात. जियान या विद्यार्थिनीला संबंधित बुरशीच्या संशोधनासाठी चीन सरकारकडून निधी देण्यात आला होता. तिचा मित्र लियू हाही चीनमधील एका विद्यापीठात याच बुऱशीवर संशोधन करत होता. त्यानेच मिशीगन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेपर्यंत ही बुरशी पोहचविल्याचे समोर आले आहे. या कृत्याकडे चीनचा कृषी दहशतवाद म्हणून पाहिले जात आहे.

चांग यांनी हा अमेरिकेवर एकप्रकारे हल्ला असल्याचा दावा केला आहे. दोन संशोधकांच्या अटकेनंतर फॉक्स न्यूजशी बोलताना चांग म्हणाले की, कथित षडयंत्र हे मोठ्या घडामोडींचे संकेत देत आहे. अमेरिकेला अस्थिर करण्यासाठी चीन गुप्तपणे अनेक दिवसांपासून मोहीम चालवत आहे. हे रोखायचे असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे चीनसोबतचे सर्व संबंध तोडावे लागतील, असे चांग यांनी स्पष्ट केले.

विषारी बुरशी सापडण्याचे प्रकरण केवळ जैविक तस्करीचे म्हणता येणार नाही. हे प्रकरण वेगळे आहे. माओवादी सिध्दांतासानुसार हे एक व्यापक पीपल्स वॉरच्या रणनीतीचा भाग आहे. शत्रूला राजकीय, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत आणि अस्थिर करण्याचा त्यामागचा उद्देश असल्याचेही चांग यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT