Bihar Law and Order news : मागील काही दिवसांबत बिहारमधील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आठवडाभरात तीन ठिकाणी अल्पवयीन मुली, तरुणींवर अतिप्रसंगाच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून देशभरात रोष निर्माण झाला आहे. विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात असतानाच केंद्रीय मंत्र्यांनीही घरचा आहेर दिला आहे.
'एनडीए'मध्ये मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहारमधील आपल्यास सरकारवर जोरदार टीका केली आहे. बिहारमध्ये गुन्हेगारी बेलगाम झाल्याचे सांगत पासवान यांनी मला अशा सरकारला पाठिंबा देत असल्याची लाज वाटत असल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची बिहारमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पासवान यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केल्याने विरोधकांच्या टीकेला धार आली आहे. पोलीस प्रशासन निकामी झाल्याचे सांगत पासवान यांनी गुन्हेगारी थांबविण्यासाठी वेळीच कारवाई करावी, असे बिहार सरकारला आवाहनही केले आहे. बिहार आणि बिहारवासियांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार राज्यासाठी खूप वाईट असेल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.
पासवान यांच्या या विधानांवरून आता त्यांच्यासह मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे. आमदार प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचे प्रवक्ते कुमार सौरभ यांनी पासवान यांच्या विधानांचा हवाला देत सम्राट चौधरी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकारी राहिला आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी चिराग पासवान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चिराग पासवानजी, राजीनामा देण्यासाठी कोणत्या शुभ मुहूर्ताची वाट पाहताय? दु:ख व्यक्त करणे, मगरीचे अश्रू हे केवळ त्यांचा ड्रामा आहे. राजीनामा पत्रावर सही करण्यासाठी कुणाच्या एनओसीची वाट पाहत आहात, असा टोलाही रोहिणी आचार्य यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.