Sharad Pawar Devendra Fadnavis : शेतकरी, शेतमजुरांना नेमकं काय हवं? दुष्काळ जाहीर होताच शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले 17 महत्वाचे मुद्दे...

Drought relief, farmer loan waiver, Maharashtra farmers, drought declaration : दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीने दिलासा मिळणं आवश्यक आहे. त्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून या मागण्यांची शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
Dharad Pawar, Devendra Fadnavis
Dharad Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra drought update : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आणखी काही तालुक्यांचा या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदतीसाठीच्या उपायोजना सुरू केल्या आहेत. यापाश्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १७ महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये वंचित तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करणे, शेती व शेती व्यवसायासाठी घेतलेली सहकारी, राष्ट्रीयीकृत, अर्बन बँका व पतसंस्थांची कर्जमाफी, जमीन महसूल व कृषी वीजबिल माफी, प्रतिकुटुंब २५ किलो मोफत धान्य, थेट आर्थिक मदत आदी मागण्यांचा समावेश आहे.

दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे मागणीही शरद पवारांनी केली आहे. दसरा-दिवाळीपूर्वी शेतकरी व शेतमजुरांना मदत देण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात मूद केले आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीने दिलासा मिळणं आवश्यक आहे. त्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून या मागण्यांची शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी विनंती पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.

Dharad Pawar, Devendra Fadnavis
Police car chase : थरारक Video! जीवावर उदार होत पोलिस कारच्या छतावर, 40 किलोमीटरचा पाठलाग... अशा आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या १७ मागण्या -

१. राज्यात वंचित राहिलेले तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावे.

२. संपूर्ण जमीन महसूल माफ करण्यात यावा.

३. कर्जमाफी झालेल्या तारखेनंतर आजतागायत ज्या शेतकऱ्यांनी शेती व शेती व्यवसायाशी निगडित घेतलेले सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी अर्बन बँका आणि पतसंस्था तसेच सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक, आदिवासी विभागाचे वैयक्तिक कर्ज, तसेच फळबागांसाठी घेतलेले कर्ज आणि महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम संपूर्णपणे माफ करण्यात यावी.

४. शेतकऱ्यांच्या कृषि पंपांची सर्व वीज बिले माफ करण्यात यावीत.

५. दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षमिक तसेच वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची वसतिगृह फी आणि मेस फी संपूर्णपणे माफ करण्यात यावी.

६. रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्याचे निकष शिथिल करून, मागेल त्या ठिकाणी तीन किलोमीटरच्या परिसरात तातडीने रोजगाराची कामे सुरू करण्यात यावीत.

७. पुण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना देऊन त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

Dharad Pawar, Devendra Fadnavis
SC to OBC demand : आम्हाला अनुसूचित जातीत राहायचं नाही, OBC मध्ये समावेश करा! 'या' समाजाने केली धक्कादायक मागणी

८. टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज खंडित करू नये. तसेच दुष्काळग्रस्त भागात कोणत्याही प्रकारचे लोडशेडिंग करण्यात येऊ नये.

९. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ किलो धान्य सरसकट मोफत देण्यात यावे.

१०. दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व शेतमजुरांकडील पशुधनासाठी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात यावे.

११. जलसंधारणाची कामे सुरू करण्यासाठी सध्याचे निकष शिथिल करून विशेष निधी उपलब्ध करून देत ही कामे तातडीने सुरू करण्यात यावीत.

१२. दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये तसेच शेतमजुरांना २५ हजार रुपये अनुदान तातडीने त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यावे.

१३. दुष्काळामुळे फळबागा, केळी, ऊस व धान्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.

१४. ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना शासनाद्वारे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात तातडीने आदेश निर्गमित करण्यात यावेत.

१५. शेतकरी अथवा शेतमजूर यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांअंतर्गत प्रलंबित असलेली थकित देयके व त्यावरील अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे.

Dharad Pawar, Devendra Fadnavis
Gokul election news : मंत्री मुश्रीफ यांची तातडीने भाजप कार्यालयात धाव, महायुतीतील धुसफूस शांत होईना; चंद्रकांत पाटील, महाडिकांसोबत बंद दाराआड चर्चा...

१६. दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेली संपूर्ण निधी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने वर्ग करण्यात यावा.

१७. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात यावी व आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात यावेत. तसेच या अधिवेशनात झालेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करून, नुकसानग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना दसरा व दिवाळीपूर्वी आवश्यक आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित करण्यात यावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com