Kangana Ranaut vs Cockroach Janta Party : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेत आलेल्या 'कॉक्रोच जनता पक्ष' (CJP) आणि 'Gen-Z' आंदोलनावरून आता भाजपच्या खासदार कंगना राणावत आणि CJP यांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे.
कंगना राणावत यांनी आंदोलनादरम्यान व्हायरल झालेल्या रील्स आणि वापरलेल्या भाषेवर टीका केल्यानंतर CJPचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
सौरव दास यांनी माध्यमांशी बोलताना, "भाजपच्या (BJP) कंगना राणावत यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षातील सदस्यही फारसे गांभीर्याने घेत नाहीत. मग आम्ही त्यांना का गंभीरतेने घ्यावे?" असा सवाल उपस्थित केला. तसेच, "माझ्या मते Gen-Z, Gen-Alpha किंवा युवा पिढीतील अनेकजण त्यांच्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्या आता राजकारणी आहेत," असेही त्यांनी म्हटले.
यावेळी सौरव दास यांनी हिमाचल प्रदेशातील कंगना राणावत (Kangana Ranaut) यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यातील एका जुन्या व्हिडिओचाही (Viral Post) उल्लेख केला. त्या व्हिडिओमध्ये खासदार म्हणून अपेक्षेपेक्षा अधिक काम करावे लागत असल्याचे कंगना यांनी म्हटल्याचा संदर्भ देत, त्यांच्या राजकीय भूमिकेवर त्यांनी टीका केली.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कंगना राणावत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर Gen-Z आंदोलनासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये आंदोलनादरम्यान व्हायरल झालेल्या रील्स, वापरलेली भाषा आणि सादरीकरण यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
कंगना राणावत यांनी पोस्टमध्ये, "माझ्या आयुष्यात इतका घाणेरडा प्रकार मी कधीच पाहिला नाही. Gen-Z आंदोलनाशी संबंधित रील्स पाहून मळमळल्यासारखे होते. त्यातील भाषा, बोलण्याची पद्धत आणि प्रत्येक फ्रेममधील दृश्ये अत्यंत असभ्य आणि धक्कादायक वाटली," असे मत व्यक्त केले होते.
या पार्श्वभूमीवर CJPचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी कंगना राणावत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्याने हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर दोन्ही बाजूंच्या वक्तव्यांची चर्चा सुरू असून, यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.