CM Chandrababu Naidu On Tirupati Temple .jpg Sarkarnama
देश

Chandrababau Naidu: चंद्राबाबू नायडूंचं तिरुपती मंदिराबाबत पुन्हा मोठं विधान, वाद पेटणार? आधी लाडू प्रसाद अन् आता हिंदू...

CM Chandrababu Naidu On Tirupati Temple : आंध्र प्रदेशातील टीडीपी नेते चंद्राबाबू नायडूंनी काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा,असा धक्कादायक आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती.

Deepak Kulkarni

Tirupati Balaji Temple : आंध्र प्रदेशातील टीडीपी नेते चंद्राबाबू नायडूंनी काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा,असा धक्कादायक आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती.आता त्याच चंद्राबाबू नायडूंच्या ( CM Chandrababu Naidu) आणखी एका विधानावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी (ता.21) तिरुमाला-तिरूपती (Tirupati) देवस्थान म्हणजेच लोकप्रिय तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंना कामावर ठेवायला हवं असं वक्तव्य केलं आहे. मंदिरात पूजा केल्यानंतर नायडू यांनी हे विधान करतानाच जे दुसऱ्या धर्माचे लोक मंदिरात सध्या कामावर आहेत, त्यांच्या भावना न दुखावता त्यांची दुसऱ्या जागी कामावर नियुक्ती करा असे आदेशही मुख्यमंत्री नायडू यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आपल्या कुटुंबासह तिरुमला येथे वेंकटेश्वर स्वामी मंदिरात पूजेसाठी आले होते. नायडू यांचा नातू देवांशच्या वाढदिवसानिमित्त ते याठिकाणी पोहोचले होते. पूजेनंतर हे कुटुंब वेंगमम्बा अन्नदान वितरण केंद्रामध्ये प्रसाद वाटपात सहभागी झालं. याचवेळी त्यांनी तिरूमाला मंदिरात फक्त हिंदूंना कामावर ठेवायला हवं असं वक्तव्य केलं. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता असते.

मुख्यमंत्री नायडू यांनी देशभरातील सर्व राज्यांच्या राजधानींमध्ये वेंकटेश्वर स्वामी मंदिर बांधण्याची योजना असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच जगभरात भगवान वेंकटेश्वराच्या संपत्तीच्या रक्षणासाठी पवित्र धागा बांधण्यात आला असून परदेशातही मंदिरांची स्थापना करण्यास उत्सुक असल्याचंही चंद्राबाबू यावेळी म्हणाले.

मागील सरकारकडून तिरुमाला परिसरातील 35.32 एकर जमिनीत मुमताज हॉटेल सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याचा आरोपही मुख्यमंत्री नायडू यांनी केला. तसेच आपल्या सरकारनं सत्तेत येताच त्या हॉटेलची परवानगी रद्द केली आहे.

याचवेळी तिरुमाला परिसरातील सात डोंगरांजवळ कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक काम होता कामा नये अशी तंबीही दिली.जे लोक जेवणासंबंधित व्यवसायासाठी परवानगी घेतात,त्यांनाही फक्त शाकाहारी पदार्थच ठेवता येणार असल्यासंबंधीचे विधान केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT