Devendra Fadnavis On Congress: मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट आरोप; म्हणाले, दंगलीतील आरोपी काँग्रेसच्या...

Nagpur Violence : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सोमवारी (ता.17) नागपूरमध्ये दंगल उसळली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस प्रथमच शहरात आले आहेत. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दंगलीमागची कारणे जाणून घेतली.
Congress Vs Devendra Fadnavis
Congress Vs Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूरच्या दंगलीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय वॉर सुरू झाला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मुस्लिमांच्या भावना भडकावल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. घटनेमागचे सत्य शोधून काढण्यासाठी काँग्रेसने सत्य शोधन समितीची स्थापना केली आहे. ही समिती शनिवारी(ता.22) नागपूरध्ये असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) काँग्रेसची समिती सत्य शोधायला नव्हे तर लांगुलचालन करण्यासाठी आली असल्याचा थेट आरोप केला. अकोला दंगलीतील आरोपी या समितीचा सदस्य असल्याने ते काय फॅक्ट फाईंड करणार असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सोमवारी (ता.17) नागपूरमध्ये दंगल उसळली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच शहरात आले आहेत. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दंगलीमागची कारणे जाणून घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या (Congress) सत्य शोधन समितीचाही चांगलाच समाचार घेतला. या समितीला घटनास्थळी जाण्यास रोखण्यात आले आहे. समितीने महायुती सरकार व पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, या समितीला फक्त राजकारण करायचे आहे, एक समाजाची सहानुभूती मिळावायची असल्याने नागपूरमध्ये आले. ज्या भागात दंगल घडली तेथे संचारबंदी लागू लागू आहे. त्यामुळे पोलिस परवानगी मिळणारच नव्हती. समितीत अकोल्याचे आमदार साजिद पठण यांचाही या समितीत समावेश आहे. त्यांचे नाव न घेता फडणवीस यांनी अकोल्याच्या दंगलीतील आरोपीला समितीत घेतले असल्याचे सांगितले.

Congress Vs Devendra Fadnavis
One Nation-One Election : 'एक देश एक निवडणूक' कधी लागू होणार? जेपीसी अध्यक्ष पी. पी चौधरींनी दिली माहिती

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले, हिंसाचारात ज्यांचे नुकसान झाले त्यांना सात दिवसांच्या आत नुकसान भरपाई दिली जाईल. हिंसाचारातील आरोपींना मदत करणाऱ्यांना सह आरोपी  केले, असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही अस असा  इशाराही यावेळी फडणीस यांनी दिला.

चादर जाळल्याचा अपप्रचार

कुराणातील आयात असलेली हिरव्या रंगाची चादर जाळल्यावरून दंगल उसळ्याचे बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे वृत्त फेटाळून लावले. खोटा प्रचार केला जात असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना त्यांनी दगडफेकीत ३३ पोलिस जखमी असल्याचे सांगितले. आतापर्यंत १०४ व्हीडीओ पडताळणी करण्यात आली आहे. ९२ जणांना अटक करण्यात आली.

Congress Vs Devendra Fadnavis
Nana Patekar : "एक महिला आपलं घरदार"; हुंड्याच्या वक्तव्यावर करुणा शर्मांची नाना पाटेकरांवर टीका

आतापर्यंत 104 व्हिडीओ पडताळणी करण्यात आली आहे. 92 जणांना अटक करण्यात आली. शेवटचा गुन्हेगार सापडेपर्यंत कारवाई सुरू राहील. ज्यांनी कोणी नुकसान केले त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com