
Tirupati Temple Stampede : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी (Tirupati Temple) मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. या देवस्थानमध्ये होणाऱ्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासन समितीकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
तरीही बुधवारी (ता. 08) रात्री तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घेटनेत (Accident) आतापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झाला असून तीसहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. अशातच आता या मंदिरात चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली? याबाबतची माहिती समोर आली आहे. तिरूपती मंदिरात दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं.
9 जानेवारी रोजी होणाऱ्या या महोत्सवासाठी देवस्थानकडून भाविकांना दर्शनाचे टोकन वाटप केले जात होते. हे टोकन देण्यासाठी देवस्थानाने अनेक स्वतंत्र काऊंटर्सची व्यवस्था केली आहे. अशाच पद्धतीचं एक काऊंटर विष्णू निवास मंदिराजवळ असणाऱ्या बैरागीपट्टेडा भागातील एमजीएम हायस्कूलमध्ये उभारण्यात आलं होतं.
या काऊंटरवर बुधवारी सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिवसभर ती वाढतच राहिली आणि संध्याकाळपर्यंत इथे मोठ्या प्रमाणात भाविक रांगेत उभे होते. यावेळी रांगेतील काही भाविकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. त्यानंतर इथे चेंगराचेंगरी होऊन मोठा गोंधळ उडाला आणि सहा भाविकांचा मृत्यू झाला.
मात्र, ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे याबाबतच कारण तिरुमला तिरुपती देवस्थानमचे प्रमुख बी. आर. नायडू यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, "बैरागीपट्टेडामधील काऊंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी आतमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी एक गेट काही वेळ बंद ठेवलं होतं.
अशातच आत रांगेत उभं राहिलेल्या एका महिलेला खूप अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला बाहेर जाण्यासाठी ते गेट उघडण्यात आलं. पण नेमकं त्याचवेळी गेटबाहेर उभे असलेल्या सर्व भाविकांनी एकाचवेळी आत शिरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे इथे चेंगराचेंगरीचा झाली."
दरम्यान, तिरुपती बालाजी मंदिरात झालेल्या दुर्घेटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी शोक व्यक्त केला आहे. तर मुख्यमंत्री नायडू यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून सदर परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.