CM Siddaramaiah sarkarnama
देश

Bengaluru Stampede : बेंगळुरुमधील चेंगराचेंगरीची कुंभमेळ्यातील 'त्या' घटनेशी तुलना, कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलून बसले?

CM Siddaramaiah Stampede Kumbh Mela : भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी सिद्धरमय्या यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. ते म्हणाले, या घटनेची तुलना कुंभमेळ्यातील घटनेशी करणे म्हणजे जबाबदारीतून पळ काढल्यासारखे आहे.

Roshan More

Siddaramaiah News : आयपीएल विजेता टीम आरसीबीचा सन्मान सोहळा बेंगलोरमधील चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली.

ही घटना इतकी भीषण होती की तब्बल 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर, 40 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कर्नाटक सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी वादग्रस्त विधान करत या घटनेची तुलना थेट कुंभमेळातील चेंगराचेंगरीशी केली आहे.

सिद्धरमय्या म्हणाले, 'चेंगराचेंगरी काही पहिल्यांदा झाली नाही. कुंभमेळ्यात देखील अशा घटना घडल्या आहेत. मी तुलना करून या घटनेचे समर्थन करणार नाही . मात्र, कुंभमेळ्यात 50-60 लोकांचा मृत्यू झाला. मी टीका केली नाही किंवा कर्नाटक सरकारनेही टीका केली नाही.'

भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी सिद्धरमय्या यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. ते म्हणाले, या घटनेची तुलना कुंभमेळ्यातील घटनेशी करणे म्हणजे जबाबदारीतून पळ काढल्यासारखे आहे. जर पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी देण्यास नकार दिला होता तर तुम्ही त्यांच्यावर दबाव का टाकला? लोकं मरत असताना तुम्ही कार्यक्रम सुरु का ठेवला? असा सवाल देखील जोशी यांनी विचारला आहे.

पोलिस आयुक्त निलंबित

कर्नाटक सरकारने या घटनेनंतर मोठी कारवाई करत पोलिस आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त, मध्य विभागाचे डीसीपी,एसीपी,क्यूबन पार्क पोलिस स्टेशनचे पीआय, स्टेशन हाऊस ऑफिसर आणि क्रिकेट स्टेडियमचे प्रभारी यांच्यावर निलंबित केले आहे. पोलिसांनी आरसीबीचे मार्केटींग प्रमुख निलिख सोसाळे यांना अटक केली आहे. तसेच आरसीबी फ्रँचायझीसह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शिवकुमारांनी मागितली माफी

उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेवरून माफी मागितली आहे. ते म्हणाले, येवढ्या मोठ्या संख्येने लोक येतील, अशी अपेक्षा प्रशासनाला नव्हती. स्टेडीयमची क्षमता 35 हजाराची आहे. मात्र, प्रत्यक्षात तीन लाख लोक आले. गेट तोडण्यात आले. या घटनेसाठी मी माफी मागतो. तसेच शिवकुमार यांनी या घटनेचे भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT