'Madam N' And Influencer Spies: कोण आहे पाकिस्तानी हेरगिरांची 'आका' ISIची एजंट 'मॅडम एन; भारतात पसरवलं गुप्तहेराचं जाळं

How 'Madam N' Lured Indian Social Media Influencers To Spy For Pakistan: 'मॅडम एन'ने भारतात सुमारे ५०० हून अधिक गुप्तहेराचं स्लीपर सेल जाळे तयार केले होते. ते देशातील अनेक ठिकाणी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तिचे पती पाकिस्तानी नागरी सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत.
Noshaba Shehzad 'Madam N'
Noshaba Shehzad 'Madam N'Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi: काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर देशात हेरगिरी करणाऱ्या अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, जे देशाची गुप्त माहिती पाकिस्तानला देत होते. युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) हीच्या अटके नंतर पोलिसांनी पंजाबमधून नुकतेच जसबीर सिंग नावाच्या आणखी एका युट्यूबरला अटक केली आहे. त्यानंतर रोज नवीन माहिती समोर येत आहे.

ज्योती आणि जसबीरवर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानच्या गुप्तचर संघटना (आयएसआय) संबंधित असलेल्यांचा सातत्याने शोध घेत आहे. अशातच लाहोरमध्ये 'ट्रॅव्हल एजन्सी' चालवणाऱ्या एका पाकिस्तानी बिझनेस वुमनचे नाव समोर आले आहे. तिच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

नोशाबा शहजाद (Noshaba Shehzad) नावाच्या या महिलेने ज्योती मल्होत्रासह भारतातील अनेक युट्यूबर्सना मदत केली, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. पाकिस्तानात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या युट्युबर्सना तिने मदत केली. त्यानंतर तिनं त्यांचा हेरगिरीसाठी उपयोग केला.

नोशाबा शहजाद ही लाहोरमध्ये 'जयाना ट्रॅव्हल अँड टुरिझम' नावाची कंपनी चालवते. आयएसआयने नोशाबा शहजादचे कोड नेम 'मॅडम एन' ठेवलं आहे. 'मॅडम एन'ने भारतात सुमारे ५०० हून अधिक गुप्तहेराचं स्लीपर सेल जाळे तयार केले होते. ते देशातील अनेक ठिकाणी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तिचे पती पाकिस्तानी नागरी सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत.

पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने या मॅडम एनला भारतात स्लीपर सेलचे जाळे उभारण्याची जबाबदाली दिली होती. दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात शहजादला प्रवेश होता. तिला हव्या असलेल्या व्यक्तीला पाकिस्तानचा व्हिसा सहज मिळत होता. तिच्या एका फोनवर व्हिसा मिळत असे, एवढा तिचा दरारा आहे. तिने पाच हजाराहून अधिक भारतीय युट्युबर्सला आपल्या जाळ्यात ओढले आहे.

Noshaba Shehzad 'Madam N'
Vidarbha Politics: विदर्भात रस्सीखेच! ग्रामीण भागात काँग्रेस मजबूत, शहरी भागावर भाजपची पकड

नौशाबा शहजाद ही पाकिस्तान गेलेल्या युट्युबरची ओळख पाकिस्तानच्या लष्करी अधिकारी आणि आयएआयच्या अधिकाऱ्यांसोबत करुन देत असे. तिने हजारो हिंदू आणि शीख व्यक्तींना पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण दिले होते. गेल्या सहा महिन्यात भारतातील तीन हजार नागरिक आणि दीड हजार अनिवासी भारतीयांना पाकिस्तानात पाठविण्यात तिनं मदत केली होती.

Noshaba Shehzad 'Madam N'
NCP News: 'त्या' सात आमदारांमुळे अजितदादांच्या स्वप्नाला खीळ; 2 वर्षांपासून केलेले प्रयत्न ठरले व्यर्थ

नोशाबा दानिशच्या संपर्कात होती दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात व्हिसा अधिकारी म्हणून काम करणाऱ्या आयएसआयचा कार्यकर्ता दानिश ऊर्फ एहसान-उर-रेहमान याच्याशीही नोशाबा ही संपर्कात होती. ज्योती मल्होत्राच्या अटकनंतर दानिशला मे महिन्यात भारतातून हद्दपार करण्यात आले होते.

नोशाबा शहजाद ही पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. तिची 'जयाना ट्रॅव्हल अँड टुरिझम' कंपनी ही एकमेव कंपनी आहे जी पाकिस्तानात शीख आणि हिंदू व्यक्तीसाठी तीर्थयात्रेचे आयोजन करते. काही दिवसापूर्वी तिनं दिल्ली आणि इतर शहरांमध्ये काही ट्रॅव्हल एजंट नेमले आहेत, जे आता सोशल मीडियावर आपल्या कंपनीची जाहिरात करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com