Cockroach Janata Party news Sarkarnama
देश

Cockroach Is Back : 'कॉकरोच इज बॅक'! पहिल्यांदाच भाजपवर थेट वार, 'CJP' च्या नव्या पोस्टने वेगळं वळण

Cockroach Janata Party news, CJP new account : अभिजीत दीपके यांनी आपल्या खासगी आणि सीजेपीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असल्याचा दावाही केला आहे.

Rajanand More

Viral political posts : अमेरिकेत शिक्षण घेणारे अभिजीत दीपके यांनी सुरू केलेल्या कॉकरोच जनता पार्टीला सोशल मीडियात अल्पावधीच तुफान प्रतिसाद मिळाला. इन्स्टाग्रामवर सीजेपीच्या फॉलोअर्सचा आकडा तब्बल १ कोटी ४० लाखांच्या पुढे गेला आहे. त्यानंतर काही तासांपूर्वीच सीजेपीचे एक्स अकाऊंट भारतात बंद करण्यात आले आहे. दीपके यांनी लगेच कॉकरोज इज बॅक नावाने दुसरे अकाऊंट सुरू केले असून त्यावर नेटकऱ्यांच्या उड्या पडत आहेत.

अभिजीत दीपके यांनी कॉकरोज इज बॅक हे अकाऊंट सुरू करताना थेट भाजपवर पहिल्यांदाच वार केला आहे. या नव्या अकाऊंटवर आपल्याला ब्लॉक करण्यामागचे कारण असे लिहित त्यावर एक कॉकरोच भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ खात असल्याचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. त्यासोबत भाजप आणि कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्याही दाखविण्यात आली आहे.

एकप्रकारे सीजेपीची लोकप्रियता चार दिवसांच वाढल्याने एक्स अकाऊंट खाते भारतात ब्लॉक होण्यामागे भाजपच असल्याचा आरोप दीपके यांनी या पोस्टच्या माध्यमातून केला आहे. युवकांच्या शक्तीला कमी लेखू नका, असे संदेशही दीपके यांनी या पोस्टमध्ये दिला आहे. सीजेपीचे इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्स भाजपपेक्षा अधिक झाले आहेत.

अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न

दीपके यांनी आपल्या खासगी आणि सीजेपीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असल्याचा दावाही केला आहे. या अकाऊंटवर सातत्याने हल्ले होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीजेपीच्या फॉलोअर्समध्ये अत्यंत वेगाने वाढ होत असल्याने संपूर्ण जगभरातच त्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच त्यांचे एक्स अकाऊंट बंद झाल्याने आणि इन्स्टाग्राम खाते हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याने फॉलोअर्सकडून संतापही व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, दीपके हे मुळचे महाराष्ट्रातील असून शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आहेत. काही काळ त्यांनी आम आदमी पक्षाच्या सोशल मिडिया टीममध्येही काम केले आहे. त्यावरून त्यांच्यावर आता या पक्षासाठी काम करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपच्या मदतीनेच हा ट्रेंड सुरू करण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे. दीपके यांनी हे आरोप फेटाळून लावले असून त्याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT