Cockroach Janata Party : भाजपलाही मागे टाकले, सोशल मीडियात धुमाकूळ घालणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'ला पहिला धक्का

X account suspended, viral political satire India : केवळ पाच दिवसांतच सीजेपीने एक चळवळ बनली असून इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे.
CJP X account suspended
CJP X account suspendedSarkarnama
Published on
Updated on

India social media trends : सोशल मीडियात अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय ठरलेल्या कॉकरोज जनता पार्टीला (CJP) पहिला धक्का बसला आहे. सीजेपीला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असून अत्यंत कमी कालावधीत कोट्यवधी फॉलोअर्स झाले आहेत. मात्र, सीजेपीचे एक्स अकाऊंट भारतात बंद करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी दिली आहे. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

नार्वेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याच्या मुद्यावरून तेथील महिला पत्रकारानेही सोशल मीडियातून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या महिला पत्रकाराचे फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले होते. आता कमी कालावधीत कोट्यवधी लाखो फॉलोअर्सचा भाजपचा रेकॉर्ड मोडणाऱ्या सीजेपीचे एक्स अकाऊंट बंद करण्यात आले आहे. यावरून दिपके यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आपला आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिपके यांनी म्हटले आहे. हे अपेक्षितच होते. आमचा सोशल मीडियात आवाज दाबला तरी लोकांच्या मनातील रोष कसा थांबवाल. सुरूवातीला अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. पण अकाऊंट हॅक न झाल्याने ते भारतात बंद करण्यात आले आहे. आम्ही काहीही चुकीचे लिहिले नव्हते. आम्ही काही मागण्या करत होतो. त्याबदल्यात आमचे अकाऊंटच बंद करण्यात आले, असेही दिपके यांनी म्हटले आहे.

CJP X account suspended
थेट मुख्यमंत्र्यांना भिडणारी 'वाघीण', महिला IPS अधिकारी पुन्हा मैदानात; जुनी प्रकरणं उकरून काढणार...

दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कॉकरोच या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यावरून ते देशातील बेरोजगारांना कॉकरोच म्हणाल्याचा आरोप होऊ लागला.

त्यावर सरन्यायाधीशांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली होती. पण त्यानंतर लगेचच दिपके यांनी सोशल मीडियातून कॉकरोच जनता पार्टी ही मोहिम उघडली. या माध्यमातून ते बेरोजगारीसह विविध प्रश्नांवरून सरकारकडे विविध मागण्या करत आहेत.

CJP X account suspended
पक्षाच्याच नेत्यासोबत एकत्रित घेतला फ्लॅट? कोण आहेत वादात अडकलेल्या महिला खासदार?

केवळ पाच दिवसांतच सीजेपीने एक चळवळ बनली असून इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. तसेच फेसबुक आणि एक्सवरही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राजकीय पक्षांतील नेतेही सीजेपीचे सदस्य बनले आहेत. सीजेपीकडे प्रामुख्याने तरुणाईचे आकर्षण वाढत असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com