CJP Abhijeet Dipke news Sarkarnama
देश

Cockroach Janata Party : अभिजीत दीपकेंनी टाकला बॉम्ब; कॉक्रोच जनता पार्टीकडून मोदी सरकारविरोधात दिल्लीतील पहिल्या आंदोलनाची घोषणा

Abhijeet Dipke news : पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी घेतली जाईल. देशातील युवकांनी जंतरमंतर व शांततामय आंदोलनात सहभागी होण्यासाठी यावे, अशी विनंती अभिजीत दीपके यांनी केली आहे.

Rajanand More

CJP latest news : सोशल मीडियात तरूणाईचे आकर्षण ठरलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने केंद्र सरकारविरोधातील पहिल्या आंदोलनाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सध्या अमेरिकेत असलेले पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हेही भारतात परतणार असून या आंदोलनातही सहभागी होणार आहेत. त्यांनी देशभरातील पार्टीच्या सदस्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियासह जगभरात कॉक्रोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. या डिजिटल पार्टीचे सोशल मीडियात कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. सोमवारी दीपके यांनी सोशल मीडियातून आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या ६ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.

अभिजीत दीपके भारतात येणार

अभिजीत दीपके हे स्वत: या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ते ६ जूनला थेट दिल्ली विमानतळावरून आंदोलनाच्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती खुद्द त्यांनी दिली. त्यांनी सोशल मीडियात याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, दिल्ली विमानतळावर मी ६ जूनला येणार असून तिथून थेट पोलीस ठाण्यात जाणार आहोत.

पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी घेतली जाईल. देशातील युवकांनी जंतरमंतर व शांततामय आंदोलनात सहभागी होण्यासाठी यावे, अशी विनंती दीपके यांनी केली आहे. कोट्यवधी विद्यार्थ्यांना फटका बसला असून सरकारने याची जबाबदारी घ्यायला हवी, असे दीपके यांनी म्हटले आहे. दिल्लीत आल्यानंतर आपल्याला अटकही होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, दीपके यांनी ही घोषणा केल्यानंतर त्यावर आता उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी ही पार्टी अस्तित्वात आल्यानंतर केवळ डिजिटल स्वरुपातच काम सुरू राहणार का, असा सवाल केला होता. आता या घोषणेचे अनेकांनी स्वागत केले आहे. तर त्यावरून टीकाही होऊ लागली आहे. काही त्याला स्टंट म्हटले आहे तर काहींनी त्याचा ड्रामा असा उल्लेख केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT