Congress vs BJP : केरळ काबीज करणाऱ्या काँग्रेसला जोरदार झटका; सत्ता असलेल्या दुसऱ्या राज्यात भाजपचा बंपर विजय

Himachal municipal election results : राज्यातील २५० जिल्हा परिषद वॉर्ड आणि १६८४ पंचायत वार्डांचे मतमोजणीही सुरू आहे. अद्याप त्याचे कल समोर आलेले नाहीत.
BJP vs Congress (AI Image)
BJP vs Congress (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

BJP local body success : केरळमध्ये दहा वर्षांनंतर सत्ता मिळविलेल्या काँग्रेसला दुसऱ्या राज्यात जोरदार धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पुढीलवर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याची काही महिने आधीच काँग्रेसला राज्यात पराभवाची चव चाखावी लागली आहे. राज्यात चार प्रमुख महापालिकांपैकी तीन ठिकाणी पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. भाजपने तीन महापालिकांमध्ये बंपर विजय मिळवत विधानसभेआधीच लढाई एकतर्फी जिंकली आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी, सोलन आणि धर्मशाला महापालिकांमध्ये कमळ फुलले आहे. काँग्रेसला केवळ पालमपूरमध्ये विजय मिळविता आल्याने पक्षाला झटका बसला आहे. मंडी महापालिकेत भाजपने १४ पैकी १२, सोलनमध्ये १७ पैकी १० तर धर्मशालामध्ये १७ पैकी ११ जागांवर भाजपपुरस्कृत उमेदवारांचा विजय झाला आहे.

एकमेव महापालिकेत सत्ता आलेल्या पालमपूरमध्ये काँग्रेसने १७ पैकी ११ जागा जिंकल्या आहेत. या महापालिकेत भाजपला केवळ दोन जागांव विजय मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीआधीच्या या निकालांनी काँग्रेसचे टेन्शन वाढविले आहे. दक्षिणेतील चार राज्य वगळता काँग्रेसची केवळ हिमाचल प्रदेशात सत्ता आहे. महापालिका निवडणुकांतील निकाल काँग्रेससाठी अलर्ट देणारे ठरले आहेत.

BJP vs Congress (AI Image)
महिला IPS अधिकाऱ्याचं 'ते' खळखळून हसणं व्हायरल; काही मिनिटांतच अडकल्या वादात

राज्यातील २५० जिल्हा परिषद वॉर्ड आणि १६८४ पंचायत वार्डांचे मतमोजणीही सुरू आहे. अद्याप त्याचे कल समोर आलेले नाहीत. या निकालांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागात कोण वरचढ ठरणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले. शहरी मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. ग्रामीण भागातील मतदार कुणाच्या बाजूने उभे राहणार, हे पुढील काही तासांत स्पष्ट होईल.

BJP vs Congress (AI Image)
माजी पंतप्रधानांकडून लेकासाठी मातब्बर नेत्याची पक्षातून हकालपट्टी; नंतर इतिहास घडला...

दरम्यान, भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी महापालिका आणि पंचायत निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा विजय झाल्याचा दावा केला आहे. हिमाचलमधील जनतेने काँग्रेसची जनविरोधी धोरणे, प्रशासकीय अव्यवस्था, ठप्प पडलेली विकासकामांविरोधात मतदान केले. राज्यातील जनता आता काँग्रेस सरकारवर नाराज असल्याचे हे संकेत आहेत. हिमाचलमध्ये जनतेला आता परिवर्तन हवे आहे, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com