Social media political movement : कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियात अत्यंत कमी कालावधात कमालीची लोकप्रियता मिळविली आहे. CJP च्या फॉलोअर्सचा आकडा सहा दिवसांतच तब्बल दोन कोटींच्या पुढे गेला आहे. काल सीजेपीचे एक्स अकाऊंट बंद केल्यानंतर संस्थापक अभिजीत दीपके यांनी लगेच दुसरे अकाऊंट सुरू केले. आता दीपके यांनी केंद्रीय मंत्र्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
सीजेपीने आजपासून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ऑनलाईन सह्यांची मोहीम सुरू केली आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षही आक्रमक झाले आहेत. त्यानंतर आता प्रधान सीजेपीच्या निशाण्यावरही आले आहेत. सीजेपीकडून त्यासाठी एक ऑनलाईन पिटीशन तयार करून त्यावर सह्या करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आता खरं काम करण्याची वेळ आल्याचे सांगत अभिजीत दीपके यांनी यामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आता जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आहे. नीट पेपरफुटीमुळे २२ लाख विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. काहींना आत्महत्या करावी लागली. ही यंत्रणेची चूक आहे. त्यामुळे काहीही झाले तरी प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा. त्यासाठी आपण दबाव निर्माण करू. जेणेकडून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असे दीपके यांनी म्हटले आहे.
जीवे मारण्याची धमकी
पहिली मोहीम हाती घेताच दीपके यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दीपके यांनी सोशल मीडियातून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी व्हॉट्सअपवर आलेल्या काही हिंदी भाषेतील मेसेजचे स्क्रीनशॉट एक्सवर पोस्ट केले आहेत. 'ऐक, पैसे मिळतील तुला. हे अकाऊंट बदं कर. नाहीतर भाजपमध्ये ये. नाहीतर अमेरिकेतही तुला मारू,' असा धमकी मेसेज आला आहे.
दुसऱ्या एका मोबाईल क्रमांकावरूनही दीपके यांना धमकी देण्यात आली आहे. आता नंबर मिळाला आहे. तुझे घर मिळाला वेळ लागणार नाही. कुठे राहतो, भारतातच ना?, अशी धमकी देण्यात आली आहे. दीपके यांना व्हॉट्सअपवरून कॉल करण्याचा प्रयत्न झाल्याचेही स्क्रीनशॉटमध्ये दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.