Congress news : विधानसभा निवडणुकीनंतर आता देशातील 10 राज्यांतील आमदारांचा 'भाव' वाढला; काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवणार

Rajya Sabha elections 2026, Election Commission India : गुजरातमधील रिक्त होणाऱ्या चार जागांपैकी एक जागा सध्या काँग्रेसकडे आहे. शक्तिसिंह गोहिल हे काँग्रेसचे राज्यसभेतील गुजरातचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव सदस्य आहेत.
Rajya Sabha Election, Congress
Rajya Sabha Election, CongressSarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha polls : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर आता भारतीय निवडणूक आयोगाने देशातील १० राज्यांतील २४ जागांसाठी राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानुसार १८ जूनला मतदान आणि त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक काँग्रेसवर नामुष्की ओढविणारी ठरणार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह २३ नेत्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. तर शिबू सोरेने यांच मागीलवर्षी निधन झाले आहे. झारखंडमध्ये दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये प्रत्येकी चार जागा रिक्त होणार आहेत.

मागील महिन्यांत झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये एनडीएचा मोठा फायदा झाला होता. प्रामुख्याने भाजपने राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी आगेकूच केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीनंतरही राज्यसभेच्या जागांमध्ये फरक पडणार आहे, असे चित्र आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये एनडीएच जागा वाढतील. तर काँग्रेसच्या जागांमध्ये घट होईल.

Rajya Sabha Election, Congress
Rajya Sabha Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीसोबतच महाराष्ट्रात राज्यसभेचाही धुराळा; आयोगाकडून तारखा जाहीर, कुणाची वर्णी लागणार?

गुजरातमधून काँग्रेस हद्दपार

गुजरातमधील रिक्त होणाऱ्या चार जागांपैकी एक जागा सध्या काँग्रेसकडे आहे. शक्तिसिंह गोहिल हे काँग्रेसचे राज्यसभेतील गुजरातचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव सदस्य आहेत. आता त्यांचा कार्यकाळ संपत आहे. पण पुन्हा एकदा सदस्य निवडून येण्याइतपत आमदारांचे संख्याबळ काँग्रेसकडे नाही. त्यामुळे ही जागाही भाजपला जाणार आहे. परिणामी मागील अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा गुजरातमधून एकही सदस्य राज्यसभेत नसेल. काँग्रेससाठी ही मोठी नामुष्की मानली जात आहे.

कोणत्या राज्यांमध्ये किती जागांसाठी निवडणूक (कंसात जागा) -

आंध्र प्रदेश (४), गुजरात (४), झारखंड (२), मध्य प्रदेश (३), मणिपूर (१), मेघालय (१), राजस्थान (३), अरुणाचल प्रदेश (१), कर्नाटक (४), मिझोराम (१).

Rajya Sabha Election, Congress
'कॉकरोच जनता पार्टी'चा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा पाहिलात का? राजकीय नेत्यांना बसेल हादरा...

राज्यसभेचा निवडणूक कार्यक्रम -

नोटीफिकेशन - १ जून

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - ८ जून

अर्जांची छानणी - ९ जून

अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत - ११ जून

मतदान - १८ जून (सकाळी ९ ते दुपारी ४)

मतमोजणी - १८ जून (सायं. ५ नंतर)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Rajya Sabha Electiom
Top-10-News 2
BJP Rajya Sabha Politics
CP Radhakrishnan, Arvind Kejriwal, Raghav Chadha
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com