District Collector Ruchika Chauhan firmly asked husbands occupying women corporators’ chairs to vacate seats during an official meeting. Sarkarnama
देश

District Collector action : बैठकीत नगरसेविकांच्या खुर्च्यांवर बसले पती; संतापलेल्या महिला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली ‘जागा’

Ruchika Chauhan Takes Strong Action in Meeting : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला काही नगरसेविकांचे पती हजर होते. नगरसेविकांच्या खुर्च्यांवर त्यांचे पती बसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना चांगलेच फटकारले.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. ग्वाल्हेरमध्ये जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी बैठकीदरम्यान नगरसेविकांच्या खुर्च्यांवर बसलेल्या त्यांच्या पतींना उठवून मागे बसायला लावले.

  2. चौहान यांनी स्पष्ट केले की महिला आता सक्षम आहेत आणि त्यांना स्वतःची जबाबदारी पार पाडू द्यावी.

  3. या कारवाईने महिला सक्षमीकरणाचा ठोस संदेश दिला असून पतींच्या हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

District Administration’s Stand on Gender Respect : महिला सरपंच, सदस्य असो की नगरसेविका... विविध सरकारी कार्यक्रम, बैठकांमध्ये अनेकदा त्यांचे पतीच उपस्थित राहत असल्याचे चित्र आजही देशातील अनेक भागांत दिसते. हे चित्र बदलण्यासाठी सरकारी पातळीवरही प्रयत्न केले जातात. पण अजूनही त्यात शंभर टक्के यश आलेले नाही. नुकताच असाच एक प्रकार समोर आला.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी एक बैठक बोलावली होती. ग्लाल्हेर शहरातील स्वच्छता, रस्ते, वाहतूक, आरोग्य यांसह विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला स्थानिक नगरसेवकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यात महिला नगरसेवकांचाही समावेश होता.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला काही नगरसेविकांचे पती हजर होते. नगरसेविकांच्या खुर्च्यांवर त्यांचे पती बसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना चांगलेच फटकारले. आता महिला सशक्त झाल्या आहेत, त्यांना त्यांचे काम करू द्यावे, असे सांगत त्यांनी नगरसेविकांच्या पतीला खुर्च्यांवरून उठविले आणि मागील बाजूला बसण्यास सांगितले.

याविषयी बोलताना जिल्हाधिकारी रुचिका चौहान म्हणाल्या, ग्वाल्हेर महापालिका राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये समाविष्ट आहे. सकाळी बैठकीत काही महिला आणि त्यांचे पती सहभागी झाले होते. ज्या व्यवस्था निश्चित करण्यात आल्या आहेत, त्या विचारपूर्वक केल्या आहेत. महिला ज्या क्षेत्रात प्रतिनिधित्व करत आहेत, तिथे आवश्यकतेनुसार काम करायला हवे.

महिलांनी बैठकांमध्ये स्वत: आपले म्हणणे मांडायला हवे. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल. महिलांना आरक्षण मिळालेल्या कायद्यांनुसार, त्यांनी आपली जबाबदारी पार पाडायला हवी. त्यामध्ये आपले योगदान द्यायला हवे, असे जिल्हाधिकारी चौहान म्हणाल्या. तसेच त्यांनी पतींच्या सहभागावरही नाराजी व्यक्त केली.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: बैठक कुठे झाली?
A: ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.

Q2: जिल्हाधिकारी कोण होत्या?
A: रुचिका चौहान.

Q3: जिल्हाधिकाऱ्यांनी पतींना काय सांगितले?
A: खुर्च्यांवरून उठून मागे बसायला सांगितले.

Q4: या कारवाईतून काय संदेश देण्यात आला?
A: महिलांना स्वयंपूर्णपणे प्रतिनिधित्व करू द्यावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT