LPG cylinder price hike in India April 2026 Sarkarnama
देश

LPG Cylinder Price: एप्रिल फूल नव्हे! आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ; हॉटेलमधील जेवण महागणार

Commercial LPG Cylinder Prices Hiked on First Day of New Financial Year: जागतिक कच्च्या तेलाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात मोठी वाढ झाली आहे.

Mangesh Mahale

Latest update on LPG cylinder price in India: अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धाच्या झळा जगाला बसत आहे. इंधनाच्या तुटवडा लक्षात घेता यात मोठी वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ झाली आहे. 195 रुपयांनी वाढ झाली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ सलग चौथ्या महिन्यात झाल्याने हॉटेल-रेस्टॉरंट मालकांचे कंबरड मोडलं आहे. परिणामी खाद्यपदार्थ- जेवण महागण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणच्या हॉटेलमध्ये ही यापूर्वीच दरवाढ झाली आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली असली तरी घरगुती एलपीजी सिलिंडर आणि विमान इंधनाच्या म्हणजेच एटीएफच्या (ATF) दरात कोणतीही वाढ झाली नसल्याचे पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ७ मार्च रोजी वाढ करण्यात आली होती.

व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान कारखानदारांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे.आगामी काळात बाहेरचे जेवण आणि इतर सेवा महागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बीपीसीएल, आयओसी, एचपीसीएल यांसारख्या सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. नवी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ₹२,०७८.५० झाली आहे. कोलकातामध्ये ₹२,२०८.०० तर चेन्नईमध्ये गॅस सिलिंडर ₹२,२४६.५० रूपयांना मिळणार आहे. मुंबईमध्ये आता गॅस सिलिंडरची किंमत २,०३१ रूपये झाली आहे. ही माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOC) वेबसाइटने दिली आहे.

इस्त्रायल-इराणच्या संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलांच्या किंमतीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन्ही देशात युद्ध सुरु झाल्यानंतर तिसऱ्यांदा ही दरवाढ झाली आहे. पण तरीही पेट्रोल कंपन्यांनी दरवाढ स्थिर ठेवली होती. गेल्या वर्षी मार्चमध्ये २ रुपये प्रती लिटर दर कमी केल्यानंतर दरवाढीत कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT