NEW Rules: ATM, रेल्वे तिकीट, बँकिंगचे नियम बदलले! तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम करणारे 10 महत्वाचे अपडेट्स

Financial Changes from 1 April 2026:आजपासून ATM, बँकिंग आणि रेल्वे तिकीट नियमांमध्ये मोठे बदल. तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम करणारे 10 महत्वाचे अपडेट्स जाणून घ्या.
 Financial Changes from 1 April 2026
Financial Changes from 1 April 2026Sarkarnama
Published on
Updated on

आजपासून (एक एप्रिल) नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या नव्या आर्थिक वर्षांत आपल्या दैनदिन जीवनातील अनके गोष्टी, नियम बदलणार आहेत, ते काय आहे जाणून घेऊया

ATM - पैसे काढणे महाग होणार

नव्या आर्थिक वर्षांपासून ATM मधून पैसे काढताना काळजी घ्या, कारण आता ATM मधून पैसे काढण्यासाठी मर्यादा घातल्या आहेत.बँका आता UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्याची विनामूल्य मर्यादा म्हणून मोजतील. 5 ट्रान्झॅक्शननंतर प्रत्येक वेळी 23 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, बंधन बँकेत कमी बॅलेन्स राहिल्यामुळे व्यवहार अयशस्वी झाल्यास 25 रुपये दंड आकारला जाईल.HDFC सारख्या बॅंकाना हा नियम लागू होत आहे.

पैसे काढण्याची मर्यादा कमी

डेबिट कार्डसाठी दररोज पैसे काढण्याची मर्यादा पंजाब नॅशनल बँकेने (PNB) 1 लाख रुपयांवरून 50,000 ते 75,000 रुपये केली आहे.

नवीन फॉर्म फॉर्म 130

नोकरी करणाऱ्या ऑफिसकडून मिळणारा आता 'फॉर्म 16'मध्ये बदल करण्यात आला आहे. त्याऐवजी एक नवीन आणि स्मार्ट फॉर्म असणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून पगार आणि टॅक्सचा हा हिशेब पूर्णपणे बदलणार आहे. कारण आता फॉर्म 16' ऐवजी 'फॉर्म 130' असणार आहे यामुळे कर अहवाल आणखी स्पष्ट आणि पद्धतशीर होईल अशी अपेक्षा आहे.

 Financial Changes from 1 April 2026
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणाचं गूढ वाढलं! मोबाईल डेटामधून धक्कादायक माहिती; 'त्या' खास व्यक्ती कोण?

नवीन करप्रणाली

प्राप्तिकर कायदा 2025 आता 1961 पासून अस्तित्वात असलेल्या जुन्या आयकर कायद्याची जागा घेतली आहे. ‘मूल्यांकन वर्ष’ आणि ‘मागील वर्ष’ यासारखे शब्द काढून टाकले जातील आणि त्याऐवजी फक्त एक ‘कर वर्ष’ असे असेल.

पॅन कार्डसाठी कठोर नियम

जर तुम्हाला पॅन कार्ड काढायचे असेल तर त्यासाठी जन्मतारखेसाठी पूर्वीसारखा पुरावे म्हणजे आधार कार्ड पुरसे ठरणार नाही.

त्यासाठी नवीन नियम कडक करण्यात आला आहे. जन्मतारखेसाठी पासपोर्ट किंवा 10 वीची गुणपत्रिका बंधनकारक असेल

 Financial Changes from 1 April 2026
IAS Deputation News: IAS अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती: सरकारला मोठा दणका, शिक्षण विभागातील नियुक्तींवर प्रश्नचिन्ह

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन

2FA ही एक सुरक्षा प्रक्रिया आहे, डिजिटल व्यवहार पूर्ण करण्यासाठी किमान दोन वेगवेगळ्या प्रमाणीकरण पद्धतींची आवश्यकता असते. डिजिटल पेमेंट केवळ एका OTP ने पूर्ण होणार नाही. प्रत्येक व्यवहारासाठी किमान दोन सुरक्षा स्तरांची आवश्यकता असेल.

12 लाखांपर्यंत- उत्पन्नावर कर नाही

नवीन कर प्रणालीत लागू करण्यात आली आहे. यात मोठी सवलत देण्यात आली आहे. आता जर तुमचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. कलम 78A अंतर्गत सवलत वाढवल्याने मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार आहे.

 Financial Changes from 1 April 2026
PAN, ITR Update : 1 एप्रिलपासून आयकर, PAN, ITR काय बदल होणार? जाणून घ्या!

रेल्चेचे तिकीट रद्द करणे

तुमचा प्रवास काही कारणास्तव रद्द झाला असेल आणि तुम्हाला रेल्वेचे तिकीट रद्द करणे पूर्वीप्रमाण सोपे राहिलेल नाही. त्यात बदल करण्यात आला आहे. प्रवासाच्या 8 तास आधी तिकीट रद्द केले तर परतावा मिळणार नाही. पूर्वी ही मुदत 4 तासांची होती.

नवीन रचना-रेल्वे तिकीट परत करणे

8 ते 24 तास अगोदर रद्द करणे: फक्त 50 टक्के परतावा. 24 ते 72 तास आधी: 25 टक्के कपात असेल. 72 तासांपूर्वी: जास्तीत जास्त कॅन्सलेशन शुल्क कापले जाईल.

 Financial Changes from 1 April 2026
Lok Sabha Delimitation: केंद्रात हालचालींना वेग! लोकसभा-विधानसभेच्या जागा वाढणार; महाराष्ट्रात किती आमदार-खासदार?

प्रवास आणि सुविधा

युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या किंमतीतील बदल होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम विमान तिकीट आणि वाहतुकीवर होईल.आजपासून (1 एप्रिल) आपण जर प्रवासाला प्लॅन करीत असाल, तर काळजीपूर्वक नियोजन करा.

इंधनाचे दर

घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत आजपासून (1 एप्रिल) बदल होण्याची शक्यता आहे. CNG, PNG आणि ATM (एव्हिएशन फ्युएल) च्या किंमती देखील बदलण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com