Nana Patole
Nana Patole  Sarkarnama
देश

Congress News : खर्गे व कुटुंबीयांना जीव मारण्याची धमकी : पटोलेंकडून भाजप, राठोडांविरोधात पंढरपूर पोलिसांत तक्रार दाखल

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजप आणि भाजपचे उमेदवार मणीकांत राठोड यांच्या विरोधात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पंढरपुरात (Pandharpur) तक्रार दाखल केली. भाजप आणि राठोडांविरोधात गुन्हा दाखल न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा पटोले यांनी दिला आहे. (Complaint filed by Nana Patole against BJP, Manikant Rathore in Pandharpur)

पटोले म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनता त्यांना नाकारणार आहे, हे लक्षात आल्यानेच कमजोर मानसिकतेतून त्यांच्या उमेदवाराने काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना निषेधार्थ आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने राज्यात सर्वत्र भाजप आणि मणीकांत राठोड या धमकी देणाऱ्या भाजप उमेदवाराच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हा गुन्हा दाखल न झाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंढरपूर दौऱ्यावर आहेत, त्यामुळे स्वतः पटोले यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात जाऊन भाजप आणि मणीकांत राठोड यांच्याविरुद्ध तक्रारी अर्ज दाखल केला आहे. कर्नाटकात बोलणाऱ्या राहुल गांधींवर गुजरातमध्ये गुन्हा दाखल होतो. त्याच कायद्यानुसार भाजप आणि मणीकांत राठोड यांच्यावर कारवाई व्हावी, गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. भाजपला लोकशाही मान्य नाही. ही मानसिकता आता दिसून येत आहे, असाही आरोप पटोले यांनी भाजपवर केला.

काय आहे प्रकारण?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, त्यांची पत्नी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भाजपच्या उमेदवाराने ‘पुसून टाकण्यासाठी’ हत्येचा कट रचला आहे, असा आरोप पक्षाचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केला होता. सुरजेवाला यांनी गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड यांचे एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये ते कन्नडमध्ये "खर्गे, त्यांची पत्नी आणि मुलांचा नाश करतील’ असे कथितपणे बोलताना ऐकायला मिळत आहे.

खर्गे यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचल्याचा कथित ऑडिओ लीक झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चित्तापूरचे भाजप उमेदवार मणिकांत राठोड यांचा रवी नावाच्या कार्यकर्त्याशी बोलल्याचा ऑडिओ व्हायरल होत आहे. काँग्रेसने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे ज्यामध्ये मणिकांत राठोड यांनी रवीसोबत संवाद साधला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT