Aleixo Reginaldo Lourenco joins TMC in presence of Mamata Banerjee

 

Sarkarnama

देश

ममतांचा काँग्रेसला दे धक्का! आणखी एक बडा नेता गळाला

गोव्यात ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेसला (Congress) पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत सुरू आहे. आता ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेसला (Congress) पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या आमदाराने आज तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला.काँग्रेसचे आमदार अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo Lourenco) हे पक्षाचे कार्याध्यक्षही होते. त्यांनी काल आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 24 तासांतच ते तृणमूलमध्ये डेरेदाखल झाले आहेत.

लॉरेन्स यांनी काल (ता.20) विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला होता. त्यांना काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला आहे. त्यानंतर 24 तासांतच कोलकत्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश झाला. लॉरेन्स यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे गोवा विधानसभेतील संख्याबळ दोनवर आले आहे. लॉरेन्स हे दक्षिण गोव्यातील कुर्टोरीम मतदारसंघाचे आमदार आहेत.

लॉरेन्स यांनी कुठल्या पक्षात जाणार याबद्दल अद्याप सुरवातीला काही जाहीर केले नव्हते. ते तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. लॉरेन्स यांच्या संपर्कात मागील काही दिवसांपासून भाजपचे नेते होते. परंतु, त्यांनी भाजपला नकार दिला होता. ते कालच कोलकत्याला रवाना झाले होते. विशेष म्हणजे काँग्रेसने नुकतीच लॉरेन्स य़ांनी उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी आता पक्ष सोडल्याने काँग्रेसची नामुष्की झाली आहे.

गोव्यामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांना गोव्याचे निवडणूक प्रभारी बनवले आहे. त्यामुळे फडणवीस 23 नोव्हेंबरला गोव्यात दाखल झाले होते. ते मुक्कामी असलेल्या हॉटेलात मध्यरात्री लॉरेन्स यांनी अचानक एन्ट्री केली होती. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होती. त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याच्या चर्चेला उधाण आले होते. लॉरेन्स लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

हॉटेलातून बाहेर पडताना लॉरेन्स यांना माध्यमांनी फडणवीसांची भेट घेतल्याबाबत विचारले होते. पण त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला होता. 'आप'ने लॉरेन्स यांचा याबाबतचा व्हि़डीओ ट्विट केला होता. काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचा आरोपही आपने केला होता. काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने गोव्याला फसवलं. लॉरेन्स हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारी आहेत, असे आपने म्हटले होते. त्यामुळे लॉरेन्स यांच्या भाजप प्रवेशावरून तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर ते तृणमूल काँग्रेसच्या (TMC) वाटेवर गेल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT