Congress News Sarkarnama
देश

Donate for Desh : काँग्रेसने मागितले ‘देशासाठी दान’; पक्ष निधीसाठी मोहिम, पदाधिकाऱ्यांना द्यावे लागणार 1380 रुपये

Rajanand More

Congress News : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्यादृष्टीने निधीची जमावजमवही केली जाणार आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस भाजपला टक्कर देणार आहे. मात्र, मागील जवळपास दहा वर्षे सत्ता नसल्याने पक्षनिधीचा ओघ कमी झाला आहे. यापार्श्वभूमीवर ‘देशासाठी दान’ (Donate For Desh) ही पक्षनिधी जमविण्याची ऑनलाईन मोहिम सुरू केली जाणार आहे.

काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याकडून येत्या सोमवारी ही मोहिम सुरू केली जाईल. काँग्रेसला 138 वर्ष पूर्ण होत असल्याच्या अनुषंगाने पक्षाने देशवासिकांना निधी जमविण्याचे (Crowdfunding) आवाहन केले आहे. त्यानुसार 138 रुपये, 1 हजार 380 रुपये, 13 हजार 800 रुपये अशा निधी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी पक्षाच्या खात्यात करावा. जेणेकरून काँग्रेसला देशाला विकसित बनविण्यासाठी काम करता येईल, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ही ऑनलाईन क्राऊड फंडिंग मोहिम सुरू करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. महात्मा गांधींच्या 1920-21 मधील ऐतिहासिक टिळक स्वराज निधीपासून प्रेरित होऊन ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. 18 डिसेंबरपासून अधिकृतपणे मोहिमेची सुरूवात केली जाईल.

पक्षाचे राज्यस्तरावरील प्रत्येक पदाधिकारी, निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच पक्षाच्या केंद्रीय पातळीवरील सर्व पदाधिकाऱ्यांनी किमान 1 हजार 380 रुपयांचे योगदान द्यावे, असे आवाहन वेणुगोपाल यांनी केले आहे. दरम्यान, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, देशातील भाजप व काँग्रेससह आठ राष्ट्रीय पक्षांच्या घोषित संपत्तीत पंधराशे कोटींची वाढ झाली आहे.

 (Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT