Dheeraj Sahu : साडेतीनशे कोटींचे घबाड कुणाचे? धीरज साहू पहिल्यांदाच बोलले, मागील 30 ते 35 वर्षात...

Congress MP : आय़टी विभागाने सुमारे ३५१ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
Congress MP Dheeraj Sahu
Congress MP Dheeraj SahuSarkarnama
Published on
Updated on

IT Raid : काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांचे घर आणि कंपन्यांवर आयकर विभागाने केलेली छापेमारी देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी छापेमारी ठरली आहे. यामध्ये जवळपास 350 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यावरून देशभरात भाजपने आंदोलन करत काँग्रेसवर निशाणा साधला होता. पण साहू यांची काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. अखेर त्यांनी या छापेमारीवर आपले मौन सोडले असून याच्याशी काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना साहू (Dheeraj Sahu) यांनी पहिल्यांदाच सविस्तर माहिती दिली ते म्हणाले, माझ्या 30 ते 35 वर्षांच्या राजकीय (Politics) प्रवासात पहिल्यांदाच अशाप्रकारची घटना घडली आहे. त्यामुळे माझे मन दुखावले आहे. छापेमारीमध्ये जप्त करण्यात आलेले पैसे माझ्या कंपनीशी संबंधित आहेत, हे मी मान्य करतो. माझ्या मद्य कंपनीशी (Liquor Firm) संबंधित हे पैसे आहे. मद्याच्या विक्रीतून मिळालेले हे पैसे असल्याचा खुलासा साहू यांनी केला आहे.

Congress MP Dheeraj Sahu
Lok Sabha Security Breach : संसदेत घुसखोरीचा हा होता 'प्लॅन बी'

माझा भाऊ राजकारणात असून आम्ही विकासाची खूप कामे केली आहेत. माझे वडील गरजूंना नेहमीच मदत करतात. आम्ही अनेक महाविद्यालये, शाळा सुरू केल्या आहेत. माझ्या मद्य निर्मितीचा व्यवसाय आहे, तो माझे कुटुंबीय आणि नातेवाईक चालवतात. मागील शंभर वर्षांपासून ही कंपनी आहे, असेही साहू यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मद्य व्यवसायातील व्यवहार फक्त रोखीत होतात. जप्त करण्यात आलेली रक्कम या व्यवहारातीलच आहे. या पैशांचा काँग्रेस किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. तसेच हा सर्व पैसा माझा नसून कुटुंबीय आणि इतर संबंधित कंपन्यांचा आहे. आता आयकर विभागाने (Income Tax) छापेमारी केली असून त्यांना मी प्रत्येक गोष्टीचा हिशोब देईन, असे साहू म्हणाले.

Congress MP Dheeraj Sahu
Ramakant Khalap News : 'त्या'बाबत मोदींनी नेहरूंवर आरोप करणं योग्य नाही..!

मी प्रत्यक्ष व्यवसायात नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. तेच आयकर विभागाला उत्तरे देतील. त्यानंतर आयकर विभाग ठरवेल, हा काळा पैसा आहे की नाही. याकडे लोक कसे पाहत आहेत, हे मला माहिती नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, आय़टी विभागाने सुमारे 351 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. ओडिशातील बोध डिस्टिलरी कंपनीशी संबंधित ही रक्कम असल्याचा दावा केला जात आहे. ही कंपनी साहूंशी संबंधित आहे.

(Edited By - Rajanand More)

Congress MP Dheeraj Sahu
Amol Shinde Family : "...नाहीतर मी आत्महत्या करेन!" ; संसदेची सुरक्षा भेदणाऱ्या मुलाच्या वडिलांचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com