Haryana Assembly Election Sarkarnama
देश

Haryana Assembly Election On Congress : हरियाणा जिंकायचंच, काँग्रेसकडून स्टार प्रचारकांसह अनुभवी निरीक्षकांची नियुक्ती

Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जोरदार तयारी केली असून, निवडणुकीसाठी अनुभवी काँग्रेसने स्टार प्रचारक आणि दिग्गज नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.

Pradeep Pendhare

Mumbai News : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा राजकीय धुरळ्यानं जोर धरला आहे. भाजप आणि काँग्रेसनं हरियाणा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. कोणत्यारी राजकीय उणिवा राहू नये यासाठी दोन्ही पक्षांकडून अनुभवी नेत्यांना मैदानात उतरलं गेलं आहे.

काँग्रेसला हरियाणा जिंकण्याच्या टप्प्यात आल्याचं वाटत असून, तिथं कोणताही दगाफटका न होण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुने खरगे आणि नेते राहुल गांधी यांनी अनुभवी नेते मैदानात उतरवले आहेत. काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांसह तीन दिग्गज नेत्यांना निरीक्षक म्हणून नियुक्तं केलं आहे.

हरिणाया विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळेल, असे वाटू लागलं आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याची विधानसभा निवडणूक एकाच वेळी होतात. पण यावेळी महाराष्ट्राच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्यात. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप, या दोन्ही पक्षांनी आपपाल्या राजकीय नेत्यांच्या फौजा हरियाणाच्या मैदानात उतरवल्यात. 'आप'चे (AAP) नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन झाल्यानं 'आप'च्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे.

काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधी यांनी हरियाणाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत कोणताही दगाफटका सहन करण्याची या दोघांची तयारी नाही. त्यामुळे काँग्रेसनं इथं अनुभवी नेते मैदानात उतरवलेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, अजय माकन आणि प्रताप सिंह बाजवा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या तिघं निरीक्षक हरियाणातील निवडणुकीत प्रचार, नियोजन, पदाधिकारी, उमेदवार यांच्यातील समन्वयासह विरोधकांच्या राजकीय हालचालींवर लक्ष राहणार आहे.

काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक

काँग्रेससाठी हरियाणा राज्याची निवडणूक महत्त्वाची आहे. या राज्याच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे हरियाणातील कामगिरीचा प्रभाव पुढं महाराष्ट्रातील निवडणुकीत पडणार आहे. त्यामुळे काँग्रेसनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांच्यासह 40 जण स्टार प्रचारक म्हणून हरियाणाच्या मैदानात उतरवलेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT