Angkita Dutta expelled from Congress Party for 6 years : तीन दिवसापूर्वी आसाम यूथ काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अंकिता दत्ता यांनी यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी आणि प्रभारी सचिव वर्धन यादव यांच्याविरोधात छळवणुकीचा आरोप केला होता. हा आरोप करणं डॉ. दत्ता यांना चांगलेच महागात पडलं आहे. त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यापूर्वीही डॉ. अंकिता दत्ता यांनी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष केशव कुमार यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. डॉ. दत्ता यांच्यावर काँग्रेसने केलेल्या कारवाईवर भाजपने टीका केली आहे.
काँग्रेसचा 'लड़की हूं, लड़ सकती हूं'ही घोषणा खोटी ठरली, अशा शब्दात भाजपच्या आयटी सेलचे अमित मालवीय यांनी टि्वट करीत काँग्रेसच्या धोरणावर हल्लाबोल केला आहे. "महिला सक्षमीकरणाचे हे माँडेल आहे, छळाचा आरोप करणाऱ्या महिलेची तक्रार ऐकून घेण्याऐवजी तिला पक्षातून काढून टाकण्यात आले. ही बाब महिलासाठी अयोग्य आहे," असे मालवीय यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी निवडणुकीच्या वेळी पक्षात ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी 'लड़की हूं, लड़ सकती हूं'असा नारा दिला होता. त्यावर भाजपने टीका केली होती. आता पुन्हा काँग्रेसचा हा नारा चर्चेत आला आहे.
"मी एक महिला नेता आहे, महिला असल्यामुळे श्रीनिवास बीवी आणि वर्धन यादव हे मला तुच्छतेची वागणुक देत आहेत. याबाबत मी राहुल गांधी यांच्याकडेही तक्रार केली होती, पण त्यानंतरही काही कारवाई झाली नाही. माझ्याशी संवाद साधताना हे दोन्ही नेते 'ए लडकी'असा उल्लेख करीत असतात, असे डॉ. अंकिता दत्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.
रायपूर येथे काँग्रेच्या अधिवेनात या दोन्ही नेत्यांनी माझ्यासोबत अपमानकारक शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे त्रस्त आहे. "तु काय पीते, कुठली दारु पीते," अशा प्रकारचे ते प्रश्न विचारतात. भारत जोडो यात्रेत मी सहभागी झाले होते, तेव्हा त्यांच्याविरोधात मी राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली होती. पण त्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही. सहा महिन्यापासून मला ते अशा प्रकारचा त्रास देत आहेत, अशी तक्रार डॉं. दत्ता यांनी महिला आयोगाकडे केली आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.