Kharge Calls PM Modi ‘Terrorist’ Later Clarifies: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. पण त्यावर सावरासावर करण्याचाही प्रयत्न केला. पण यामुळं त्यांना मोठ्या टीकेला समारं जावं लागतं आहे. तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत चेन्नई इथं बोलताना खर्गेंनी हे विधान केलं. त्यांच्या या विधाननंतर मात्र निवडणुकीचा माहौलच बदलून टाकला आहे, यामुळं शाब्दिक वार-प्रतिवार यांना धार आली आहे.
चेन्नईत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गेंनी अण्णाद्रमुक (AIADMK) आणि भाजप युतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी कडक शब्दांत म्हटलं की, अण्णाद्रमुकचे लोक मोदींसोबत कसे काय जाऊ शकतात? कारण मोदी समता आणि न्याय मानत नाहीत. अशा लोकांसोबत हात मिळवणी करणं हे लोकशाहीला कमजोर करण्यासारखं आहे. याच दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत दहशतवादी असा शब्दप्रयोग केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यानं मोठ्या प्रमाणावर टीकेला समोरं जावं लागत असल्यानं त्यांनी तातडीनं आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, मी हे कधीही म्हटलं नाही की पंतप्रधान हे दहशतवादी आहेत. मला असं बोलायचं होतं की, मोदी लोकांना आणि राजकीय पक्षांना घाबरवण्याचं आणि धमकावण्याचं काम करत असतात. त्यांच्या कृतीमुळं राजकीय गोटात भीतीचं वातावरण निर्माण होतं. माझ्या टिप्पणीचा उद्देश हा पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणं होतं त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करणं हा नव्हता.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या विधानावर भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खर्गेंचं हे विधान म्हणजे काँग्रेसनं नियोजित पद्धतीनं केलेला कट असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींना दहशतवादी संबोधनं हे जीभ घसरणं नाही, तर राहुल गांधींच्या इशाऱ्यावर केलेली टिप्पणी आहे. राहुल गांधी प्रत्येक दिवशी पंतप्रधानांच्याविरोधात अपमानजनक भाषेचा वापर करत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आता खर्गेंनी देखील पंतप्रधानांचा अपमान केला आहे, हे अत्यंत निंदनीय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.