BJP News : विधानपरिषद निवडणूक : आमदारकीसाठी भाजपच्या चौघांची फिल्डिंग; दुसरीकडे नितीन गडकरींनी सुचवलं नवीन नाव

MLC Election Maharashtra : संदीप जोशी यांच्या निवृत्तीनंतर विधान परिषद जागेसाठी भाजपमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे.
Political activity intensifies in Nagpur as BJP leaders compete for the vacant MLC seat following Sandeep Joshi’s retirement.
Political activity intensifies in Nagpur as BJP leaders compete for the vacant MLC seat following Sandeep Joshi’s retirement.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार संदीप जोशी यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर रिक्त होणाऱ्या या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. अवघ्या 13 महिन्यांचा कार्यकाळ लाभल्याने जोशी यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी अचानक राजकीय निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे या जागेसाठी भाजपमध्ये ‘रस्सीखेच’ सुरू झाली आहे. या जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाला संधी देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

गत विधानसभा निवडणुकीत मध्य नागपूर मतदारसंघातून प्रवीण दटके यांचा विजयी झाले होते. त्यांच्या रिक्त जागेवर नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना संधी देण्यात आली. पण त्यांना अवघ्या 13 महिन्यांचा कार्यकाळ लाभला. आता त्यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केल्याने या जागेसाठी प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, विक्की कुकरेजा आणि मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश ठाकरे यांची नावे आघाडीवर आहेत.

दयाशंकर तिवारी यांनी विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूरवर दावा केला होता. मात्र त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून संधी मिळण्याची शक्यता आहे. उत्तर नागपूरमधून म्हणून विक्की कुकरेजा यांचेही नाव चर्चेत असून, त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत त्यांनी मी आता महापालिकेची निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे म्हणूनही त्यांचे पारडे जड आहे.

Political activity intensifies in Nagpur as BJP leaders compete for the vacant MLC seat following Sandeep Joshi’s retirement.
Shivsena MLC Election: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; माजी मंत्री अन् कट्टर भाजप विरोधक नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी?

शहर विरुद्ध ग्रामीण संघर्ष :

दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजू पोतदार यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. पोतदार सध्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. नुकतेच नागपूर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन डॉ. राजीव पोतदार यांना विधान परिषद सदस्य म्हणून उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आहे. या मागणीमुळे शहर विरुद्ध ग्रामीण अशी स्पर्धा सुरु झाली आहे. यात कोणाचे पारडे जड ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com