Election Fraud India Sarkarnama
देश

Election Fraud India : ‘मतांच्या चोरी’मुळे पराभवाचा धक्का; काँग्रेसच्या 'अपराजित' नेत्याचा दावा

Mallikarjun Kharge Claims Gulbarga Lok Sabha Defeat Due to Vote Theft : राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मत चोरीमुळे पराभव झाल्याचा धक्कादायक दावा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे.

Pradeep Pendhare

Mallikarjun Kharge Gulbarga Lok Sabha election : काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर मत चोरीचा हल्ला केला. ही मत चोरी रोखण्यात अपयशी ठरलेल्या निवडणूक आयोगावर राहुल गांधींचे अजूनही घणाघात सुरूच ठेवला आहे.

यातच राष्ट्रीय राजकारणात अपराजित नेते म्हणून ओखळले जाणारे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य केले. तिथं मत चोरी झाल्यानेच आपला पराभव झाल्याचा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

देशाच्या राजकारणात अपराजित नेते म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचा 2019च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. आता त्यांनी त्याचे कारण उघड केलं आहे. ते म्हणाले, ‘‘त्यावेळीही ‘मतांची चोरी’ झाली होती. त्याची माहिती नव्हती. पाच मतदारसंघांमध्ये बोगस मतदानाने माझा पराभव झाला होता. आता ते उघडकीस आले आहे.’’

खर्गे यांनी पहिल्यांदा 1972मध्ये गुरुमितकल्ल विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यांनी तत्कालीन इंदिरा काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढवली. तेव्हापासून ते जवळजवळ 50 वर्षांपासून सतत निवडणुका जिंकत आहेत. त्यांनी 1972, 1979, 1983, 1985, 1989, 1994, 1999, 2004, 2008, 2009मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांनी दोनदा लोकसभा निवडणूकही जिंकली. या माध्यमातून त्यांनी एक विक्रम रचला.

2019 मध्ये खर्गे यांना गुलबर्गा लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. त्यावेळी मोदी लाटेमुळे हा पराभव झाल्याचे दाखवण्यात आले होते. फ्रीडम पार्क येथे आयोजित निषेध सभेत ते म्हणाले, ‘‘2019 मध्ये मी लोकसभा निवडणूक हरलो. हा पहिला पराभव आहे. त्यावेळीही ‘मतांची चोरी’ झाली होती. त्यावेळी त्याची माहिती नव्हती. पाच मतदारसंघांमध्ये बोगस मतदानाने माझा पराभव झाला होता. आता ते उघडकीस आले आहे.

पक्षाच्या नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे. अनेक राज्यांमध्ये बहुमत असूनही पक्ष फोडून सरकार स्थापन केले आहे. 2024मध्ये मोदी निवडणूक जिंकले नाहीत. ते चोरीने जिंकले. आम्ही हे बाहेर काढू, असा इशाराही मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिला.

चोरीच्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. केंद्र सरकार केवळ कर्नाटकातच नव्हे, तर अनेक राज्यांमध्ये मते चोरून सत्तेवर आल्याचा आरोप करत त्यांनी टीका केली. केंद्र सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. खासदार सोमवारी नवी दिल्लीत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करतील. या माध्यमातून ते ‘मत चोरी’ कशी झाली, याची माहिती देतील, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT