Congress Donate For Desh  Sarkarnama
देश

Congress Donate For Desh : काँग्रेसने 2 दिवसात जमवला 'इतक्या' कोटींचा निधी; महाराष्ट्र नंबर वन, बिहारही आघाडीवर...

Congress Crowdfunding : सर्वाधिक देणगीदार बिहार या आर्थिक मागास असलेल्या राज्यातून. राहुल गांधींनी किती दिली देणगी?

Chetan Zadpe

Delhi News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून निधी गोळा करण्यास सुरूवात केली आहे. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून काँग्रेसने 'देशासाठी दान' ही मोहीम हाती घेतली असून देशवासीयांना देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही मोहीम सोमवारी सकाळी सुरू झाल्यानंतर 48 तासांतच काँग्रेसच्या खात्यात 3 कोटी रुपये जमा झाले आहेत. (Latest Marathi News)

काँग्रेस पक्षाला आतापर्यंत अंदाजे 1 लाख 13 हजार लोकांनी देणगी दिली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षासाठी संसाधने उभारण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी क्राउड फंडिंग मोहीम 'डोनेट फॉर देश' सुरू केली आहे. बुधवारी (20 डिसेंबर) सकाळी 9 वाजेपर्यंत काँग्रेसच्या खात्यात 1 लाख 13 हजार 713 देणगीदारांकडून 2.81 कोटी रुपये झाले होते.

'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, बहुतांश देणगीदारांनी काँग्रेस पक्षाला 138 रुपयांची देणगी दिली आहे. केवळ 32 जणांनी 1.38 लाख रुपयांची देणगी दिली आहे. काँग्रेस पक्ष 138 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. त्यामुळे 138 रुपये देणगी देणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

यामध्ये फक्त 32 जणांनी 1 लाख 38 हजार रुपयांची देणगी दिली आहे. 626 जणांनी प्रत्येकी 13 हजार आणि 680 रुपयांची देणगी दिली आहे. 1.38 लाख रुपयांची देणगी देणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सी. पी. जोशी, निरंजन पटनायक, सुशील कुमार शिंदे, टी.एस. सिंह देव, जयराम रमेश आणि पवन खेडा यांचा समावेश आहे.

आकडेवारीनुसार, काँग्रेसला महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे 56 लाखांची देणगी मिळाली आहे. यानंतर राजस्थान 26 लाख रुपये, दिल्लीतून 20 लाख रुपये, उत्तर प्रदेश 19 लाख रुपये आणि कर्नाटकमधून 18 लाख रुपयांचा निधी देणगी म्हणून मिळाला आहे. 81 टक्के लोकांनी यूपीआयच्या माध्यमातून देणगी दिल्याचे काँग्रेसचे काही नेते सांगतात. तर सुमारे 8 टक्के निधी क्रेडिट कार्डद्वारे प्राप्त झाला आहे. बिहारमधून कमी रक्कम देणगी म्हणून मिळाली असली तरी सर्वाधिक देणगीदारांची संख्या बिहारमधील आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT