Radhika Khera Sarkarnama
देश

Radhika Kheda News : खोली बंद करून माझ्यासोबत गैरवर्तन..! राधिका खेडा यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप

Rajanand More

New Delhi News : काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्या राधिका खेडा (Radhika Kheda News) यांनी पक्षातील नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. एका नेत्याने आपल्यासोबत बंद खोलीत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत राहुल गांधींसह प्रियांका गांधी व इतर नेत्याकंडेही संबंधितांवर कारवाईबाबत मदत मागितली होती. पण कुणीच पुढे आले नाही. आता आपण कायदेशीर लढाई लढत आरोपींना शिक्षा देणार असल्याचे खेडा यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय प्रवक्त्या राधिका खेडा यांनी रविवारी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर आज त्यांनी मीडियाशी बोलताना मोठे खुलासे केले आहेत. त्या म्हणाल्या, काँग्रेस सनातनविरोधी असल्याचे मी नेहमी ऐकत होते. पण त्यावर विश्वास नव्हता. मी रामलल्लाच्या दर्शनाला गेल्यानंतर सत्य समोर आले. आईला घेऊन अयोध्येला गेले. ध्वज लावल्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला. (Latest Political News)

मला प्रत्येकवेळी अपमानित करण्यात आले. माझ्या चरित्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान छत्तीसगडमध्ये पक्षाच्या मीडिया प्रमुखांसह काही जणांनी माझ्या रुमकडे येऊन मला दारू ऑफर केली होती. सचिन पायलट (Sachin Pilot) आणि जयराम रमेश (Jairam Ramesh) यांना याबाबत सांगितले होते, असा दावा खेडा यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाच्या छत्तीसगडमधील मुख्यालयात 30 एप्रिलला मीडिया सेल प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. कार्यालयाचा दरवाजा बंद केला होता. एक मिनिट दरवाजा बंद होता. मी ओरडले, पण मदतीसाठी कुणीच आले नाही. मी तिथून कशीबशी बाहेर पडले. या प्रकाराबाबत मी सगळ्यांकडे तक्रार केली. पण कुणीच माझे ऐकले नाही, असे आरोप खेडा यांनी केले आहेत.

घटनेबाबत भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांना सांगितल्यानंतर त्यांनी छत्तीसगड सोडून जाण्यास सांगितले. राहुल गांधी (Rahul Gandhi), मुल्लिकार्जून खर्गे, प्रियांका गांधी या सगळ्यांना मेसेज पाठवला पण काहीच उत्तर आले नाही. ट्विट केल्यानंतर जयराम रमेश यांचा कॉल आला. पण हे प्रकरण दाबण्यात आले. महिलांसोबत अन्याय झाल्यानंतर पक्षातून काढले जाते. पण माझी लढाई सुरूच राहील, असे खेडा यांनी म्हटले आहे. मी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे खेडा यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT