Kangana Ranaut News : निवडणूक जिंकल्यानंतर..! राजकारणाबाबत कंगनाची मोठी घोषणा

Lok Sabha News 2024 : भाजपने कंगनाला मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपकडून या मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे.
Kangana Ranaut
Kangana Ranaut Sarkarnama
Published on
Updated on

Himachal Pradesh News : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेसमधील लढत लक्षवेधी ठरत आहे. या मतदारसंघात भाजपने बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut News) उमेदवारी देत मोठी खेळी खेळली आहे.

कंगनासमोर काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान आहे. या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास कंगनाकडून व्यक्त केला जात आहे. पण विजय झाल्यानंतर अभिनयातील करिअर सुरूच ठेवणार का, याबाबत कंगनाने मोठी घोषणा केली आहे.

राजकारण की अभिनय याबाबत कंगना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बॉलीवूड क्वीन म्हणून नावारुपाला आलेल्या कंगनाने निवडणूक जिंकल्यास अभिनयाला रामराम ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत तिने ही घोषणा केली आहे.

Kangana Ranaut
Jharkhand ED Raid: मंत्र्यांच्या सचिवाच्या नोकरावर EDचा छापा; घरात आढळले कोट्यवधीचं घबाड

अभिनयातील करिअरवर बोलताना कंगना म्हणाली, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) जिंकल्यानंतर अभिनयाची जगतातून हळू-हळू लांब जाऊ शकते. कारण एकावेळी मला एकाच कामावर फोकस करायला आवडेल.

मी चित्रपटांमध्ये अभिनय करते, दिग्दर्शन करते. पण राजकारणामध्ये लोक माझ्याशी जोडले जात असल्याचे जाणवले तर मी राजकारणचं करेन. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकांना माझी गरज आहे असे मला वाटले तर मी त्याच दिशेने जाईल. मी मंडी मतदारसंघात (Mandi Constituency) जिंकले तर राजकारणालाच प्राधान्य देईल. राजकारणात जाऊ नको, असे मला अनेक चित्रपट निर्माते सांगतात. पण लोकांच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्याला न्याय देता आला पाहिजे. लोकांच्या भावनांशी जोडले जाण्याची संधी मिळत असेल तर मी नक्की त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेन, असे कंगनाने स्पष्ट केले.

चित्रपटजगत खोटे असते. तिथे वेगळेच वातावरण असते. लोकांना आकर्षित करण्यासाठी एक फुगा बनवला जातो. पण राजकारण एक वास्तव आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. मी समाजसेवेच्या क्षेत्रात नवीन आहे. अजून खूप काही शिकायचे आहे, असेही कंगना म्हणाली.

Kangana Ranaut
Lok Sabha Election News : गळ्यात चपलांचा घालून हार उमेदवाराकडून घरोघरी प्रचार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com