Farooq Abdullah News : पाकिस्तानने बांगड्या घातलेल्या नाहीत! फारुख अब्दुल्लांच्या विधानावर भाजप भडकले

POK Issue : राजनाथ सिंह यांच्या विधानावर फारुख अब्दुल्ला यांनी केलेले हे विधान आता वादात अडकले आहे. भाजपने अब्दुल्ला यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Farooq Abdullah
Farooq AbdullahSarkarnama

New Delhi News : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पीओके म्हणजे पाकव्याप्त काश्मीरचे भारतात विलीनीकरण होईल, असे विधान नुकतेच केले होते. त्यावरून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला (Farooq Abdullah News) चांगलेच भडकले. पाकिस्तानने बांगड्या घातलेल्या नाहीत. त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत, जे आमच्यावर टाकतील, असे अब्दुल्ला म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावर वाद निर्माण झाला असून भाजपने जोरदार फटकारले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) धामधुमीत ‘पीओके’चा मुद्दा चर्चेत आला आहे. राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनीच हा मुद्दा उपस्थित केला. पश्चिम बंगालमधील एका प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले होते की, भारतात (India) होत असलेला विकास पाहून पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) लोक स्वत:हून भारतात यायचे असल्याचे म्हणतील. चिंता करू नका. पीओके आपला होता आणि नेहमी राहील. (Latest Political News)

Farooq Abdullah
Kangana Ranaut News : निवडणूक जिंकल्यानंतर..! राजकारणाबाबत कंगनाची मोठी घोषणा

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही रविवारी याविषयी वकव्य केले आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर भारताचा हिस्सा आहे. भारतीय संसदेत एक प्रस्ताव असून त्यामध्ये पीओके देशाचा हिस्सा असल्याचे म्हटले आहे. पीओके कधीच या देशापासून बाहेर राहिला नाही. याच देशाचा हिस्सा आहे. त्यामुळे आता पीओके वर इतर लोकांचे नियंत्रण कसे असेल? (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रविवारी सांगितले की, जर संरक्षणमंत्री असे म्हणत असतील तसे करा. आम्ही अडवणारे कोण आहोत? पण हे लक्षात ठेवा की पाकिस्ताने बांगड्या घातलेल्या नाहीत. त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. त्यानंतर ते बॉम्ब आमच्यावर टाकतील.

अब्दुल्ला यांच्या विधानावर भाजपचे (BJP) प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सोमवारी टीका केली आहे ते म्हणाले, आतापर्यंत केवळ पाकिस्तानातील कट्टरवादी आपल्याकडे बॉम्ब असल्याचे सांगत होते. पण आज इंडी आघाडीतील नेते फारुख अब्दुल्ला तीच भाषा बोलत आहेत. चरणजितसिंह चन्नी, विजय वडेट्टीवार यांची पाकिस्तानची भाषा आहे. इंडी आघाडीच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचे पंतप्रधान सांगतात. पण इंडी आघाडीच्या नेत्यांवरही पाकिस्तानची छाप असल्याचे दिसते, असा जोरदार हल्लाबोल सुधांशू त्रिवेदी यांनी केला.

Farooq Abdullah
Jharkhand ED Raid: मंत्र्यांच्या सचिवाच्या नोकरावर EDचा छापा; घरात आढळले कोट्यवधीचं घबाड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com