mallikarjun kharge Rahul Gandhi  sarkarnama
देश

Congress Political Crisis: बिहारमध्ये धुव्वा उडाल्यानंतर काँग्रेस समोर मोठं संकट, इंडिया आघाडीत फूट? 'हे' पक्ष बाहेर पडणार

Bihar Election 2025: बिहारमध्ये काँग्रेस आणि राजदनं विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती.त्यात काँग्रेसच्या राहुल गांधींनी व्होटचोरी,मतदारयाद्यांमधील घोळ यांवरुन केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत भाजपविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या निराशाजनक कामगिरीनंतर पराभवानंतर आता INDIA आघाडीत मोठी फूट पडण्याची संकेत मिळत आहेत.

Deepak Kulkarni

Bihar News :बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू प्रणित एनडीएनं काँग्रेस अन् राजदचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता मिळवली.या विजयात विरोधकांना मोठा झटका बसला. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसलेल्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत राजकीय वारं फिरलं. एनडीएनं (NDA) तब्बल 202 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली.

एनडीएनं तब्बल 202 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली. तर विरोधकांच्या महाआघाडीला अवघ्या 35 जागांवरच विजय मिळवता आला. विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळाचा आकडा गाठण्यातही आघाडीला यश आलं नाही. या दारुण पराभवानंतर बिहारमधून एक सर्वात मोठी राजकीय अपडेट समोर आली आहे.

गेल्या वर्षभरापासून काँग्रेस तसेच राष्ट्रीय जनता दलानं बिहार विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचं दिसून येत होतं. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजदनं विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती.त्यात काँग्रेसच्या राहुल गांधींनी व्होटचोरी,मतदारयाद्यांमधील घोळ यांवरुन केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत भाजपविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या निराशाजनक कामगिरीनंतर पराभवानंतर आता INDIA आघाडीत मोठी फूट पडण्याची संकेत मिळत आहेत.

बिहारमध्ये (Bihar) झालेल्या दारुण पराभवानंतर 'इंडिया' आघाडीतून प्रमुख मोठे पक्ष बाहेर पडणार, असल्याची माहिती समोर येत आहे. झारखंड मुक्ती मोर्चा,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,समाजवादी पार्टी,आम आदमी पक्ष लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.या पक्षांकडून काँग्रेस तसेच राजद प्रणित इंडिया आघाडीची रणनीती, नेतृत्व व विश्वासार्हता यावर उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.

राजस्थान,मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली,अन् आता बिहारसारखं मोठं राज्य गमावल्यानंतर आता काँग्रेसला आगामी काळात मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीतूनच काँग्रेसच्या रणनीतीवर सवाल उभे केले जात आहे. जागावाटपातला घोळ, उमेदवारांची निवड, फसलेला प्रचार, चुकलेलं व्यवस्थापन, मित्रपक्षांमध्ये समन्वयाचा अभाव यांसारख्या अनेक गोष्टींचा काँग्रेसला बिहारमध्ये मोठा फटका बसल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

समाजवादी पार्टी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समाजवादी पक्षानं (सपा) इंडिया आघाडीला सर्वच राजकीय पाताळ्यांवर सुधारणा आवश्यक असल्याचं मत नोंदवलं आहे. समाजवादी पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनीच इंडिया आघाडीचं नेतृत्व करावं अशीही मागणी सपाच्या आमदारानं केली आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं बिहारमधील निकालावर अत्यंत आक्रमक भूमिका मांडताना इंडिया आघाडीतील मोठ्या पक्षांनी महत्त्वाच्या राज्यांमध्ये काही ठोस आणि महत्त्वाचे निर्णय घेताना मित्रपक्षांशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे. अन्यथा इंडिया आघाडीच्या एकोप्याला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेकडून इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या समन्वयावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे.तसेच मनसेच्या विरोधाचा मुद्दा पुढं करुन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीतून बाहेर पडू शकतात,अशी चर्चा आहे.

झारखंड मुक्ती मोर्चा

बिहार निवडणुकीच्या तोंडावरच झारखंड मुक्ती मोर्चानं महाआघाडीपासून फारकत घेताना स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. तसेच महाआघाडीत प्रादेशिक मित्रपक्षांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे आगामी काळात, झारखंड मुक्ती मोर्चा इंडिया आघाडीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

आम आदमी पक्ष

बिहारमध्ये आम आदमी पक्षानं (आप)नेही महाविकास आघाडीत सहभागी न होता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय जाहीर केला होता.मात्र, 'आप'नं मोठ्या राज्यात स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर आत्तापर्यंत भर दिला आहे. त्याचमुळे आगामी काळात आता ‘इंडिया’ आघाडीतील इतर प्रादेशिक मित्रपक्षही काँग्रेसला धक्का देऊ शकतात.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा सामना करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच आहे. बंगालमध्ये काँग्रेसचं काहीच अस्तित्व नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ज्याप्रमाणे आम आदमी पार्टीने हरियाणात काँग्रेसची मदत केली नाही. काँग्रेसनेही दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपची मदत केली नाही. आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस स्वतंत्रच लढण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT