Vaibhav Khedekar : अखेर खेडेकरांनी नगराध्यक्षपदाचे मैदान सोडले; पण शिवसेना-भाजपची डोकेदुखी एका बंडखोरीने कायम

Ramdas Kadam Meeting With Vaibhav Khedekar : खेड नगरपालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोठी घडल्या.
Vaibhav Khedekar
Vaibhav Khedekarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजपचे वैभव खेडेकर यांच्या पत्नीने नगराध्यक्षपदाचा अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेतला, ज्यामुळे महायुतीचा तिढा अंशतः सुटला आहे.

  2. रामदास कदम आणि खेडेकर यांची महायुती कार्यालयातील बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

  3. तथापि, भाजपचे तालुका सरचिटणीस भूषण काणे यांनी अर्ज कायम ठेवत बंड पुकारले असून खेडच्या राजकारणात नवीन तणाव निर्माण झाला आहे.

Ratnagiri News : खेड नगरपालिका निवडणुकीत भाजपचे वैभव खेडेकर यांच्या पत्नीने उमेदवारी अर्ज भरल्यामुळे महायुतीत मोठा तिढा निर्माण झाला होता. जो सोडवण्यासाठी गेले काही दिवस वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्याला आता यश आले आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी खेडेकर यांची घेतल्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्या पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतला आहे. पण भाजपचे तालुका सरचिटणीस यांनी मात्र उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडाचे निशाण फडकावल्याने शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तर येथे आता शिवसेना (शिंदे) विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत होणार आहे.

राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचे सध्या चित्र असतानाच कोकणातील रत्नागिरीत मात्र महायुतीसह भाजपपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपवासी झालेल्या वैभव खेडेकर यांनी सुरुवातीपासूनच 'एकला चलो रे..' ची भूमिका घेतली.

नगराध्यक्षपदासाठी पत्नी वैभवी खेडेकर यांचा अपक्ष, तर नगरसेवकपदासाठी समर्थकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामुळे येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती झाली असतानाही संघर्ष तयार झाला होता. खेडेकर यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान उभे केले असून येथे शिवसेना नेते रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात होते.

Vaibhav Khedekar
Vaibhav Khedekar : रवींद्र चव्हाणांच्या शब्दानंतर वैभव खेडेकरांची तलवार म्यान; बार्गेनिंगमध्ये पत्नीसाठी मोठ्या पदाचं आश्वासन

मात्र अखेरच्या क्षणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी महायुतीच्या कार्यालयात जावून भेट घेत चर्चा केली. या चर्चेनंतर आता नगराध्यक्षपदासाठी वैभवी खेडेकर यांनी भरलेला अर्ज मागे घेतला आहे. शिवसेना-भाजपचे मनोमिलनामुळे खेडेकरांनी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीचे मैदानच सोडल्याची चर्चा रंगली आहे. तसेच खेडेकर यांच्या समर्थकांनीही भरलेले अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेची चिंता मिटली आहे.

खेड येथे महायुतीत वाद उफाळला होता. शिवसेना-भाजप एकत्र लढणार अशी चर्चा होती. तोच अर्ज भरण्याच्या आधल्या दिवशीच युतीची घोषणा झाली आणि जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला. पण भाजपला फक्त 3 जागा सोडल्याने पक्षात नाराजी वाढली होती. त्यामुळे भाजपचे नेते वैभव खेडेकर यांनी पत्नी वैभवी खेडेकर यांचा शिवसेनेच्या माधवी बुटालांच्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात

अपक्ष म्हणून भाजपच्या इच्छुकांचे अर्ज दाखल केले होते. यामुळे राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले होते. पण शिवसेना-भाजप महायुती म्हणूनच लढण्याचे ठरल्यानंतर वरिष्ठांनी सर्व अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्याने येथील राजकीय वातावरण निवळले आहे. तसेच येथे रामदास कदम व वैभव खेडेकर यांच्यातील दिलजमाईमुळे साऱ्या तर्कवितर्काना पूर्णविराम मिळाला आहे.

शिवसेनेची धास्ती कमी झालीय

रामदास कदम व वैभव खेडेकर यांच्यातील दिलजमाई झाल्याने भाजप आणि शिवसेनेत वाढलेल्या तणावावर तोडगा निघाला आहे. येथे खेडेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्जही मागे घेतल्याने शिवसेनेच्या माधवी बुटालांचा मार्ग सुकर झाला आहे. तसेच संदेश भुवड, भालचंद्र साळवी, वसंत पिंपळकर, वैजेश सागवेकर यांनी नगरसेवकपदाच्या रिंगणातून माघार घेतली आहे. यामुळे शिवसेनेची धास्ती कमी झाली असली तरी युतीची डोकेदुखी मात्र वाढलेलीच आहे.

भाजप उमेदवाराचे बंडाचे निशाण

माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्नीसह त्यांच्या समर्थक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेची धास्ती कमी झाली आहे. मात्र येथे भापची डोकेदुखी अद्याप कायम असून तालुका सरचिटणीस भूषण काणे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. अर्ज मागे न घेतल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकावल्याची चर्चा आहे. ते प्रभाग क्रमांक 6 ब मधून निवडणूक रिंगणात राहिले आहेत. शिवसेना-भाजप महायुतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर येथे नाराजी दिसून आली आहे. भाजपच्या वरिष्ठांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्नही सुरू होते. मात्र त्यांनी उमेदवारीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी ठेवली आहे.

Vaibhav Khedekar
Vaibhav Khedekar : खेडमध्ये भाजपच्या नव्या राजकीय खेळीने खळबळ; अखेर वैभव खेडेकरांनी पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवलंच

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com