Amit Shah, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Congress on Amit Shah : अमित शहांचा माफीनामा आणि राजीनाम्यासाठी काँग्रेसकडून वर्षभराचं प्लॅनिंग

Dr Babasaheb Ambedkar Jai Bapu Jai Bhim Jai Samvidhan Jairam Ramesh : अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Rajanand More

New Delhi News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा माफीनामा आणि राजीनाम्यासाठी काँग्रेसने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. शहांच्या राजीनाम्यासाठी पक्षाकडून पुढील वर्षभराचे प्लॅनिंग करण्यात आले आहे. पक्षाकडून ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ ही मोहिम लवकरच संपूर्ण देशात सुरू केली जाणार आहे. नवीन वर्षात काँग्रेसकडून शहांना लक्ष्य केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बेळगावमध्ये नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीतच ही मोहिम तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने सात दिवसांच दुखवटा जाहीर केल्याने पक्षाने ही मोहिम पुढे ढकली आहे. आता 4 जानेवारीला त्याची सुरूवात होणार आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी याबाबत माहिती दिली. संपूर्ण देशात तीन जानेवारीनंतर ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ सभा घेतल्या जाणार आहेत. तर प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारीला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी मोटी सभा होईल. 25 जानेवारी 2025 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत संपूर्ण देशभरात संविधान बचाव राष्ट्रीय पदयात्रा काढली जाणार आहे. शहांचा माफीनामा आणि राजीनामा ही एकमेव मागणी असेल, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

काय म्हणाले होते अमित शाह?

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानावरील चर्चेदरम्यान अमित शहांनी केलेल्या विधानानंतर काँग्रेस व विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आंबेडकर, आंबेडकर आंबेडकर... म्हणणे आजकाल फॅशन झाली आहे. एवढ्यावेळा देवाचा जप केला असता तर पुढील सात जन्म स्वर्गात स्थान मिळाले असते, असे विधान शहांनी केले होते.

शहांच्या या विधानावरून विरोधकांनी संसदेसह संसदेबाहेरही त्यांच्याविरोधात रान उठवले. शहांनी माफी मागणी आणि पदाचा राजीनामा द्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. त्याला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. आता काँग्रेसकडून पुन्हा एकदा शहांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात सभा घेतल्या जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT