
New Delhi News : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरून काँग्रेसने भाजप सरकारवर टीका केली आहे. अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा निवडली नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याला भाजप नेत्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे बंधू मनोहर राव यांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे.
मनोहर राव यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसवाले आज भाजपबाबत खूप तक्रारी करत आहेत. मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीबाबत काळजी घेतली नाही, असे सांगत आहे. त्यांनी जरा 20 वर्षे मागे वळून पहावे. मनमोहन सिंग यांच्या सरकारने त्यांचे गुरू नरसिंहराव यांचा किती आदर केला, असे सवाल मनोहर राव यांनी केला.
दिल्लीत त्यांच्यासाठी जमीन मिळाली नाही. आज मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि संपूर्ण कॅबिनेट तिथे होते. पी. व्ही. नरसिंहराव यांच्यावेळी कुणीही आले नव्हते. सोनिया गांधीही आल्या नाहीत. भारताच्या माजी पंतप्रधानांचे निधन झाल्यानंतर त्या हैद्राबादला येऊ शकत नव्हत्या का? संपूर्ण देश फिरत नाहीत का? त्यांनी याबाबत विचार करावा, अशी सांगत मनोहर राव यांनी सोनिया गांधींवरही निशाणा साधला.
नरसिंहराव यांचा एक पुतळाही उभारला नाही. त्यांना भारतरत्न दिले नाही. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाचेही गेटही उघडले नाही. त्यांचा आदरही केला नाही, अशी तीव्र नाराजी मनोहर राव यांनी व्यक्त केली. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी ट्रस्ट करतील, त्याबाबतची एक प्रक्रिया असते. ती केली जाईल. तुम्ही काय केले, आतापर्यंतच्या पंतप्रधानांसाठी? दिल्लीत त्यांचे काहीच नाही. मोदींनी ते दिले. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठीही जागा दिली जाईल, असेही मनोहर राव म्हणाले.
मनमोहन सिंग दहा वर्षे पंतप्रधान असताना स्वतंत्रपणे काम करू शकले नाहीत. दहा वर्षे त्यांच्या हातात काहीच नव्हते. त्यांना ज्या सुचना येत होत्या, त्यानुसार त्यांनी काम केले, असेही मनोहर राव म्हणाले आहेत. पी. व्ही. नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री असताना पूर्णपणे मोकळीक दिली होती. मनमोहन सिंग यांनी त्यावेळी हिंमतीने काम केले. पंतप्रधान आणि त्यांनी गुरू-शिष्याप्रमाणे काम केले. त्यांच्या धोरणांमुळे आज आणि त्यावेळच्या स्थितीत खूप फरक पडला आहे. व्यापारासाठी सध्या उत्साहाचे वातारवण आहे. सर्व राज्यांमध्येही त्यावेळचेच धोरण आहे, असे मनोहर राव यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.